Stamp Paper

Stamp Paper : 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द

1059 0

मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार आहेत. न्यायिक स्टॅम्प पेपर आणि गैरन्यायिक स्टॅम्प पेपर. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. ते अधिकृत मुद्रांक विक्रेते किंवा सरकार मान्यताप्राप्त बँकांमध्ये मिळतात. स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क भरले जाते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहाराच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार योग्य स्टॅम्प पेपर वापरला जातो. अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रांक व शुल्क नोंदणी विभागाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

सध्या फक्त 10 हजार रुपयांचा स्टॅम्प पेपर बँकेतून फ्रॅकिंग करून दिला जात आहे. यापूर्वी मिळणारे पाच व दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर 2015-16 च्या दरम्यान बंद करत फक्त 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारात ठेवले आहेत. आता या किमतीचे स्टॅम्प पेपर व्यवहारातून रद्द करून थेट राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून देण्याचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र यासह पाच राष्ट्रीय बँकांबरोबरच तालुकापातळीवरही स्टॅम्प पेपर फ्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Neelam Gorhe

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार

Posted by - February 1, 2024 0
    पुणे दि.३१: पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण…
Kishor Awarae

Kishore Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ धक्कदायक खुलासा

Posted by - May 14, 2023 0
पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (kishore aware) यांच्यावर गोळीबार आणि…

पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे

Posted by - October 16, 2022 0
पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास…

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 23, 2022 0
उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) विजय मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : संविधानिक नसलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नेमकं काय ? ‘या’ राज्यात आहेत सर्वाधिक उपमुख्यमंत्री!

Posted by - July 3, 2023 0
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. मागच्या वर्षी जून मध्ये एकनाथ शिंदे गट बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *