WhatsApp New Feature

WhatsApp New Feature : अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल्स होणार बंद; व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले ‘हे’ जबरदस्त फिचर

435 0

व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp New Feature) आजकाल स्पॅम कॉल्सचे (Spam Calls) प्रमाण खूप वाढले आहे. या कॉल्समुळे फसवणुकीमध्ये (Fraud) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp New Feature) व्हिडिओ कॉल करून, सेक्स्टॉर्शनला बळी पाडण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. आता अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉलपासून होणारा त्रास आता कमी होणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून एक जबरदस्त फिचर लॉंच करण्यात आले आहे.

काय आहे फिचर ?
काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या केवळ बीटा व्हर्जनवर उपलब्ध होते. मात्र, आता कंपनीने आपल्या सर्व अँड्रॉईड आणि अ‍ॅपल यूजर्ससाठी हे फीचर लाँच केलं आहे. याच्या मदतीने येणारे स्पॅम किंवा अनोळखी कॉल्स तुम्हाला सायलेंट करता येणार आहेत.

भावा मित्र नाही पैसा कमव! हॅकरने तरुणाला दिला महत्वाचा सल्ला

अशी करा सेटिंग
हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Feature) उघडावे लागेल. यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल्स हा ऑप्शन दिसेल. कॉल्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Silence Unknown Calls हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही अनोळखी कॉल बंद करू शकता. सायलेंट अननोन कॉल्स हा पर्याय बाय डिफॉल्ट बंद असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन हा पर्याय सुरू करावा लागेल. ही सेटिंग केल्यानंतर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन येणारे सर्व कॉल्स सायलेंट होतील. यामुळे विनाकारण या कॉल्सपासून होणारा त्रास कमी होणार आहे.

Whatspp ने सुरु केले ‘हे’ नवीन फीचर्स; सेंड केलेला मेसेज करता येणार एडिट

अ‍ॅप करा अपडेट
तुम्हाला जर सेटिंग्समध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Feature) अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या. जर अपडेट नसेल तर व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करा त्यानंतर तुम्हाला हे फिचर दिसेल.

Share This News

Related Post

Advay Hire

Advay Hire : ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अटक; कोण आहेत अद्वय हिरे?

Posted by - November 16, 2023 0
नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँक फसवणूक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट…
QR Code

QR Code स्कॅन करताना ‘ही’ चूक करू नका; अन्यथा गमवावी लागेल आयुष्यभराची कमाई

Posted by - November 21, 2023 0
आजकाल तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आपण काही क्षणात दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (QR Code) करू शकतो. यामुळे लोकांचे जीवन…

PUNE CRIME NEWS : सिबिल स्कोअर खराब असणाऱ्यांना व्यावसायिक कर्ज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; तिघांना बेड्या…(VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पुणे : सिबिल खराब असणाऱ्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतो, अशी सोशल मीडियावर जाहिरात करून लोकांची…
Mukesh Ambani

Jio Air Fibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Posted by - August 28, 2023 0
जिओ युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जिओ च्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना…

#ONLINE PAYMENT : डिजिटल व्यवहार करताना घ्या ‘ही’ खबरदारी, चुकल्यास होऊ शकते मोठं नुकसान

Posted by - March 7, 2023 0
गेल्या काही वर्षांपासून डिजिटल बँकिंगशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कधी एसएमएस फिशिंग, तर कधी केवायसी अपडेट करण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *