Auto Pay

Auto Pay : ऑटो पे वापरताय…? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि तोटे ?

480 0

सध्या सगळं जग हे कॅशलेस (Cashless) झालयं त्यातल्या त्यात ऑटो पे (Auto Pay) म्हणजेचं स्वयंचलित पेमेंटच (Automatic Payment) प्रमाणदेखील खूप वाढले आहे. मात्र ऑटो पेचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. ऑटो पे (Auto Pay) हा पर्याय अलीकडे अनेक जण वापरताना दिसतात. यामुळं एखादे बिल,घर,कार खरेदीचा हप्ता वेळेआधीच भरण्यासाठी आणि दंडाचा भुर्दंड (Fine) टाळण्यासाठी मदत होते. ऑटो पे (Auto Pay) सेट केल्यानंतर,ठरलेल्या वेळी तुमच्या बँक खात्यातून ठरलेली अमाऊंट कट होते.ऑटो पे वर कर्ज,क्रेडिट कार्ड पेमेंट,इलेक्ट्रिक बिल यासह अनेक बिले तुम्ही भरू शकता. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

QR Code : क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान ! तुमचा मोबाईलही होऊ शकतो हॅक

ऑटो पे वापरण्याचे फायदे?
ऑटो पेमुळं तुम्ही पेपर बिलिंग आणि मेल पेमेंटची गरज दूर करता,ज्यामुळं तुमचा कार्बन फुटप्रिंट कमी होते.
बिले ऑटो पे ने भरल्याने तुमचा वेळ वाचतो.
पैसे कट होण्याच्या दिवशी खात्यात योग्य रक्कम आहे ना याची तुम्ही खात्री करता.
ऑटो पेमुळं तुम्ही विलंब शुल्क टाळू शकता.
एकदा स्वयंचलित पेमेंट सेट केल्यावर, ते त्याच तारखेला पैसे कापून घेतात.

आता कार्ड न वापरता एटीएममधून काढता येतील पैसे, ‘या’ बँकेनं सुरू केली सुविधा

फोन पे पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे सर्व्हिस आणि त्याचे फायदे

ऑटो पे चे वापरण्याचे तोटे?
खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्यास ऑटो पे वापरल्याने खाते ओव्हरड्राफ्ट होऊ शकते. ज्यामुळं बँकेकडून दंड (Fine) आकारला जाऊ शकतो.
बिलिंगमधील चुका,व्याजदरातील वाढ, लपविलेले शुल्क किंवा इतर काही बाबींमुळं तुम्हाला फटका बसू शकतो.
ऑटो पे (Auto Pay) वापरणे म्हणजे तुमची सर्व माहिती संबंधित सेवा देणाऱ्याकडेच राहते. ज्यावेळी तुम्ही दुसरा प्रदाता निवडता त्यावेळी पहिल्याकडे तुमची माहिती कायम राहते.

यामुळे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊनच पुढील पाऊल उचलत जा.

Share This News

Related Post

SIM Card

SIM Card : 1 डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधीत ‘या’ नियमात होणार बदल

Posted by - November 21, 2023 0
दूरसंचार विभागाने सिमकार्ड (SIM Card) खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार…
Rajnikant

Rajinikanth : वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांतच्या नातवावर ट्रॅफिक पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

Posted by - November 20, 2023 0
दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांचा नातू आणि धनुषचा मोठा मुलगा यात्रा राजाला ट्रॅफिक पोलिसांनी दंड आकारला आहे. यात्रा हा आता…
Rain Alert

आता मोबाईल ,टीव्हीवर मिळणार चक्रीवादळ, पावसाचा अलर्ट; जाणून घ्या नवीन तंत्रज्ञान

Posted by - June 8, 2023 0
हल्ली निसर्गचक्र बदललं आहे. त्यामुळे चक्रीवादळ (Hurricane), अवेळी पाऊस (Rain) यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *