SIM Card

SIM Card : 1 डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधीत ‘या’ नियमात होणार बदल

464 0

दूरसंचार विभागाने सिमकार्ड (SIM Card) खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार असाल तर या नियमाबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या नियमाचे उल्लंघन केले तर तुम्हाला दंडासह कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते. केंद्र सरकारने बनावट सिमकार्डच्या आधारे होणारे गुन्हे, फसवणूक रोखण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून हे नियम लागू होणार होते. पण सरकारने 2 महिन्यांची अतिरिक्त वेळ दिली होती. आता हे नवे नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत.

काय आहे नियम?
नव्या नियमांतर्गत सिमकार्डची विक्री करणाऱ्यांना ग्राहकांची योग्यप्रकारे केवायसी करावी लागणार आहे. सरकारने सिमकार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना एकापेक्षा अधिक सिमकार्ड घेण्यावर बंदी घातली आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करु शकणार नाही. तसंच एका ओळखपत्रावर मर्यादित सिमकार्डच खरेदी करता येणार आहेत.

नियमांतर्गत सर्व सिमकार्ड विक्रेता म्हणजे पॉईंट ऑफ सेलला (PoS) 30 नोव्हेंबरपर्यंत रजिस्टर करणं अनिवार्य आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास तब्बल 10 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय जेलमध्येदेखील जावे लागू शकते. जर कोणी बनावट सिमकार्डची विक्री करताना आढळलं तर त्याला 3 वर्षांचा कारावास होईल. यासह त्याचा परवाना ब्लॅकलिस्टमध्ये टाकला जाईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

Rohit Sharma

Rohit Sharma : पुणे पोलिसांनी रोहित शर्माला ठोठावला दंड; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - October 20, 2023 0
पुणे : भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पुणे पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भरधाव…
Bank Fraud

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Posted by - March 31, 2024 0
बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल…
Whats App

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Posted by - April 27, 2024 0
मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp News) जगभरात कोट्यावधी लोक वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. मात्र…

QR Code : क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान ! तुमचा मोबाईलही होऊ शकतो हॅक

Posted by - June 9, 2023 0
देशात ऑनलाईन सुविधा सुरु झाल्यापासुन सगळेजण क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना दिसत आहेत. यामुळे देशात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *