Spam and Fraud Calls

Spam and Fraud Calls : वारंवार येणारे स्पॅम व फ्रॉड कॉल कसे बंद कराल?

416 0

माणसाने आज तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. स्मार्टफोन आणि 4जी, 5जीच्या जगात माणूस अनेक नवीन अविष्कार करत आहे. आजच्या काळात मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळं बँकेचे व्यवहार काही क्षणात होतात. त्यामुळे आपला बराचसा वेळदेखील वाचतो. मोबाईलमुळं काम सोप्पे झाले असले तरी तेवढीच आव्हाने देखील वाढले आहेत. सायबर क्राइम आणि सायबर चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे. कधीकधी अनेकांना स्पॅम कॉल (Spam Call) आणि फ्रॉड कॉल (Fraud Call) येतात. सतत येणाऱ्या या कॉल्समुळे अनेकजण वैतागतात. पण हे कॉल्स बंद कसे करायचे असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. तर हे कॉल्स बंद कसे करायचे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

स्टेप 1
स्पॅम किंवा फ्रॉड कॉल्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये असलेले डु नॉट डिस्टर्ब म्हणजेच डीएनडीचा वापर करु शकता. त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला डीएनडीचा पर्याय ऑन करावा लागणार आहे. हा पर्याय ऑन करताच तुम्हाला फालतू फोन किंवा स्पॅम कॉल्स येणे काही अंशी कमी होणार आहेत.

स्टेप 2
तुमच्या नंबरवर जास्त प्रमाणात फ्रॉड कॉल्स येत असतील तर तुम्ही ते नंबर ब्लॉक करुन टाका. जेणेकरुन पुन्हा त्या नंबरवरुन सतत फोन येणार नाहीत. तसंच, स्पॅम नंबरवरुन येणाऱ्या फोन कॉलला कधीच उत्तर देऊ नका. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.

स्टेप 3
आजकाल स्मार्टफोनमध्ये एक इनबिल्ड फिचर देण्यात येते. ‘कॉलर आयडी अँड स्पॅम’. हे फिचर ऑन केल्यानंतर कॉल आल्यास तो स्पॅम आहे की नाही हे कळू शकणार आहे. अशावेळी तुम्ही स्पॅम कॉल उचलणे टाळू शकणार आहेत. व तिथल्या तिथेच नंबर ब्लॉक करु शकणार आहात. हे फिचर गुगल फोन अ‍ॅपच्या माध्यमातून दिले जाते.

Share This News

Related Post

SIM Card

SIM Card : 1 डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधीत ‘या’ नियमात होणार बदल

Posted by - November 21, 2023 0
दूरसंचार विभागाने सिमकार्ड (SIM Card) खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार…
Prajakta Mali

Prajakta Mali : सख्या रे….घायाळ मी हरिणी… म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले ‘ते’ फोटो; चाहते झाले फिदा

Posted by - July 31, 2023 0
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. प्राजक्ताचे (Prajakta Mali) लुक…
Twitter New Logo

Twitter New Logo: अखेर इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला; आता ब्लू बर्डच्या जागी दिसणार ‘हा’ लोगो

Posted by - July 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो (Twitter New Logo) बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू…
Phone Pe

फोन पे पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या काय आहे सर्व्हिस आणि त्याचे फायदे

Posted by - June 8, 2023 0
फोन पे पेमेंट अ‍ॅपने काही दिवसांपूर्वी अकाउंट एग्रीगेटर सेवा सुरू केली आहे. फोन पे कंपनीने त्यांची सहकारी कंपनी PhonePe Technology…
Internet

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Posted by - February 26, 2024 0
जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *