मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून होणार सुरू ? पाहा

144 0

राजस्थानच्या पश्चिम भागापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तो सरासरी सप्टेंबर महिन्याच्या 16 किंवा 17 तारखेपासून सुरू होतो. यंदा मात्र हा प्रवास 15 दिवस आधीच सुरूच होणार आहे.यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे वेळेतच आगमन झाले होते. त्यानंतर पुढील प्रवास अनुकूल वातावरणामुळे जोरदार झाला आणि वेळेतच संपूर्ण देश व्यापला. अर्थात बंगालच्या उपसागरात जून महिन्यात पाऊस पडण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात कमी दाबाचे पट्टे तयार झाले नाहीत. त्यामुळे या महिन्यात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वाढले. त्यामुळे सलग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली.

परिणामी जून महिन्यामधील पावसाची सरासरी अगदी काही दिवसांतच जुलै महिन्यात भरून निघाली. या वर्षी मध्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतामधील सर्वच राज्यांत मान्सून मनसोक्त बरसला. त्यामुळे सर्वच भाग पाणीदार झाला आहे.राजस्थान भागातही पावसाने मुसळधार हजेरी लावली. आता मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. एरवी मान्सून सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होतो. मात्र अनुकूल स्थितीमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होणार आहे.

राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून थांबलेला पाऊस आता मात्र पुन्हा सक्रिय होणार आहे. गणेशोत्सवात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Share This News

Related Post

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची महाराष्ट्र सरकारला विनंती

Posted by - February 16, 2022 0
महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

पुणे : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - August 27, 2022 0
पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी ,…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची नियुक्ती

Posted by - September 25, 2022 0
मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात…

लम्पी रोगामुळे नुकसान भरपाईपोटी राज्यात 3091 पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह

Posted by - November 1, 2022 0
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा…

कसबा पेठ विधानसभा मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

Posted by - February 28, 2023 0
पुणे : कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळ गोदाम येथे कसबापेठ विधानसभा मतदार संघ मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *