औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण कधी होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

150 0

मला अनेकजण विचारतात, की औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? नाव काय हो ते कधीही बदलू शकतो पण मला सर्व सोईंनी परिपूर्ण असं संभाजीनगर करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

याच मुद्द्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी  सूचक विधान केलं असून औरंगाबादचं नामकरण होणार हे नामकरण मीच करणार असं त्यांनी म्हटलं आहे.

उध्दव ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. हे मी विसरलेलो नाही आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केल्याशिवाय मी राहणार नाही. याची सुरुवात करण्यात आली आहे. चिखलठाण येथे होणाऱ्या विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याबाबतचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. कॅबिनेटने देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Share This News

Related Post

Documents

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Posted by - November 18, 2023 0
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी (Caste Certificate) तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु…

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…

राजकुमार संतोषींचा “गांधी गोडसे एक युद्ध” प्रदर्शनाच्या शर्यतीत; नथुरामच्या भूमिकेत मराठमोळा चिन्मय मांडलेकर झळकणार; पहा फर्स्ट लूक

Posted by - December 27, 2022 0
इतिहासातील एक असं पान जे कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दामिनी, घायल, घातक अशा…

नवऱ्याची पुणे पोलिसांकडे अजब तक्रार, पुणे पोलीस आयुक्तांनी दिला मोलाचा सल्ला

Posted by - May 11, 2022 0
पुणे- आजकाल व्हाट्स अप हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. व्हाट्स अपवर काहीजण तासातासाला डीपी बदलतात तर काहींचा डीपी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *