TOP NEWS MARATHI : “घात झाला दिघे साहेब घात झाला !” खा. राजन विचारेंचं आनंद दिघेंना भावनिक पत्र व्हायरल (Video)

275 0

” साहेब आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण आज तुमची जरा जास्तच आठवण येतेय साहेब ! वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो, लढलो, धडपडलो… ह्या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत… अजूनही आहात… अंधारात वाट दाखवत धगधगत्या दिव्यासारखे !”

shivsena leader Rajan Vichare emotional letter viral write to anand dighe

अधिक वाचा : शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे ,तितका कधीच नव्हतो. कारण आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळं फक्त मीच नाही, फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्वसामान्य मराठी माणूससुद्धा अस्वस्थ झालाय. आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू, घात झाला दिघे साहेब घात झाला ! तो पण आपल्याच लोकांकडून… म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब !

शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब, तेव्हा तुमची 56 इंचाची छाती अभिमानानं भरलेली पाहिली होती आम्ही साहेब ! ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, महाराष्ट्रात ज्या ठाण्यानं आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय. छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब ! ह्या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना साहेब ! आणि आज हे दुसऱ्यांदा झालंय पण तुम्ही नाही आहात मग ह्यांना कसं माफ करायचं आम्ही !तुम्ही असता तर काय केलं असतं ..? म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब … साहेब आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं …. ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही ! आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून गहिवरून येतंय साहेब ! तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत पण रडायचं नाही लढायचं हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली.

अधिक वाचा : खासदार संजय राऊतांवरील कारवाईचे मूळ ‘म्हाडा’ने केलेल्या ‘त्या’ तक्रारीत 

साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला, म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब ! पण साहेब, काळजी नसावी कोणत्याही पदापेक्षा, वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्त्वाची, पक्ष महत्त्वाचा… तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी..! कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्या सोबत ! साहेब आम्ही जिवाची बाजी लावू पण शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना ! हे ब्रीद पुसू देणार नाही आम्ही ! पुन्हा एकदा तुमचा सैनिक ह्या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे. कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या ! पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या आणि पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा..!

Share This News

Related Post

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - December 2, 2022 0
पुणे : पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या…

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा घोटाळा : पोलिसांकडून 6 रॅकेट उध्वस्त ; 56 आरोपींना ठोकल्या बेड्या… पाहा

Posted by - August 25, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 56 जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून मोबाईल…

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना मिळणार लस, वृद्धांसाठी बूस्टर डोस

Posted by - March 16, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी या महामारीविरुद्धची लढाई सातत्याने सुरू आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही…

मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून होणार सुरू ? पाहा

Posted by - August 27, 2022 0
राजस्थानच्या पश्चिम भागापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तो सरासरी सप्टेंबर महिन्याच्या 16 किंवा 17 तारखेपासून सुरू होतो. यंदा…

सदाभाऊ खोत यांचे केतकी चितळेला समर्थन, त्यावर रुपाली पाटील यांची खोतांवर टीका

Posted by - May 16, 2022 0
पुणे- शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळेंला समर्थन दिले आहे. मला तिचा अभिमान आहे असे त्यांनी म्हटलं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *