अजिंक्यतारा किल्ल्यावरून दरीत कोसळलेल्या वृद्धाला वाचवण्यात यश … (VIDEO)

166 0

सातारा : सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरायला गेलेले एक 64 वर्षीय वृध्द पाय घसरून थेट दरीत कोसळले. बचाव पथकला त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं. दौंडमधील ६४ वर्षीय हणमंत जाधव हे साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचा पाय घसरला आणि ते किल्ल्यावरुन थेट दरीत कोसळले.

रात्रीचा किर्र अंधार आणि कोसळणाऱ्या पावसात तब्बल १४ तास हणमंत जाधव दरीत पडून होते. मात्र सकाळी व्यायामाला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आलं असता तात्काळ पोलिसांना फोन करुन मदत पथकाला बोलावण्यात आलं. काल सायंकाळच्या सुमारास हणमंत जाधव पाय घसरल्याने दरीत कोसळले होते.

मदतीसाठी जवळपास कुणीच नसल्यामुळे संपूर्ण रात्र आणि १४ तासांहून अधिक काळ ते दरीत अडकून पडले होते. अखेर शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यात आलं. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Posted by - August 11, 2022 0
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला खा. सुळे यांनी केली दुसऱ्या वर्षासाठीची घोषणा मुंबई : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र…

“मॉडेल राजभवनात काय करते ? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?” राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओढवून घेतले पुन्हा नवीन संकट

Posted by - December 8, 2022 0
मुंबई : संतापजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या…
Pune News

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Posted by - May 8, 2024 0
पुणे : सर्व दिशांना विकसित होणारे पुणे आता कॉस्मोपॉलिटन झाले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका आता मुंबईला मागे टाकून राज्यातील…
VIJ VITARAN

VIDEO : पिंपरी एमआयडीसी परिसरात बारा तासांपासून वीज गायब ! 630 कंपन्यांचं उत्पादन ठप्प; उद्योजक हैराण

Posted by - September 7, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं एमआयडीसी परिसरात मागील बारा तासांपासुन वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा…

पुणे जिल्ह्यात वाळू माफियांवर धडक कारवाई, 20 यांत्रिकी बोटी नष्ट तर 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 26, 2022 0
पुणे- जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. या कारवाईत 20 यांत्रिक बोटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *