रेस्टोरंट सारखे फ्रेंच फ्राईज बनवण्याची योग्य पद्धत

230 0

अनेकांना फ्रेंच फ्राईज हा प्रकार खूप आवडतो. अगदी उपवासाला सुद्धा चालेल असा हा प्रकार नेमका घरी बनवला की मऊ पडतो. पण हॉटेलमध्ये मात्र तो छान लागतो. चला तर मग पाहूयात फ्रेंच फ्राईज बनवण्याची योग्य पद्धत…

तर मग सर्वात पहिले बटाटे स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर सोला आणि त्याला उभे काप द्या. हे काप खूप मोठेही करू नका आणि खूप पातळ देखील करू नका. यानंतर हे सर्व फ्रेंच फ्राईज स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवा. पाणी खळाखळ उकळले की यामध्ये हे सर्व फ्रेंच फ्राईज टाका. लक्षात ठेवा हे फ्रेंच फ्राईज पाण्यामध्ये घातल्यानंतर झाकायचे नाहीत, अगदी मोजून दोन ते तीन मिनिटे या गरम पाण्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज सोडायचे आहेत.

त्यानंतर हे पाणी उपसून घ्या आणि या फ्रेंच प्राईजवर कॉर्नफ्लॉवर भुरभुरून टाका. वाफवताना एक गोष्ट लक्षात घ्या बटाटे मऊ पडता कामा नयेत. त्यानंतर त्यांना डीप फ्रीजमध्ये तासभर ठेवा.

तळण्यापूर्वी यांना बाहेर काढा आणि कडकडीत तेलामध्ये यांना तळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवूनच यांना तळायचे आहे. आणि हलके गुलाबी झाल्यानंतर लगेच काढून घ्या. उपवास असेल तर नुसता मीठ घालून हे मस्त फ्रेंच फ्राईज खायला घ्या किंवा पेरी पेरी सॉस ,मसाला ,चाट मसाला ,तिखट यांबरोबर तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. या प्रोसिजरने फ्रेंच प्राईज केले तर ते मऊ पडत नाहीत.

Share This News

Related Post

गृहिणींसाठी खास टिप्स : तांदूळ जुना आहे की नवीन कसा ओळखावा…?

Posted by - August 16, 2022 0
किचन टिप्स : घरामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याची शुद्धतेची पडताळणी प्रत्येक दक्ष गृहिणी करताच असते . पण तांदूळ…

रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अब्दुल जलील शेख यांची निवड

Posted by - November 1, 2022 0
पुणे : अनेक अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी व वस्तू व सेवा कर विभागाचे माजी अधिक्षक अब्दुल जलील…

20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यास…; संभाजी ब्रिगेडनं दिला हा इशारा

Posted by - October 7, 2023 0
२० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यसरकारच्या वतीने देण्यात आले आहे. जे महात्मा ज्योतिराव…

गणपती बाप्पाच्या आगमनावेळी शंख, नारळासह या 4 गोष्टी घरी आणा ; घरावर राहील श्रीगणेशाची कृपादृष्टी

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : गणपती बाप्पांचं आगमन 31 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली…

#कसबा पोटनिवडणूक : भवानी पेठेतील पदयात्रेत महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांना मोठा प्रतिसाद

Posted by - February 16, 2023 0
पुणे : राजकीय दृष्ट्या जागरूक असणाऱ्या प्रभाग क्र.१७, भवानी पेठ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची बुधवार दि.१५ फेब्रुवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *