निवृत्ती वेतनधारकांनो ! आता घर बसल्या काढा हयातीचा दाखला

225 0

पुणे : पुण्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्त झालेल्या पेन्शन धारकांना आता घरबसल्या हयातीचा दाखला तयार करता येणार आहे. हा दाखला तयार करण्यासाठी पुण्यात विशेष प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आलं आहे.त्यामुळे हा दाखला काढण्यासाठी करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे.

केंद्र सरकारसह विविध सरकारी खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन अर्थात निवृत्ती वेतन मिळते; मात्र त्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात तुम्ही जिवंत आहे की नाही, याचे प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागते. ते वेळेत सादर केले नाही, तर तुमची पेन्शन बंद होते. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांना बँकेत जावे लागते. कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याचा त्रास दरवर्षी ज्येष्ठ नागरीकांना सहन करावा लागत होता. आता हा त्रास केंद्र सरकारने कमी केला आहे. त्यासाठी ‘जिवनप्रमाण ॲप’ विकसित करण्यात आले आहे.

राज्य अथवा केंद्र सरकारचे निवृत्ती वेतनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर देशातील ३७ शहरांमध्ये ही सुविधा पहिल्या टप्प्यात देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. सेवानिवृत्तधारकांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

Share This News

Related Post

VIDEO : सांगलीत आढळलेल्या ‘त्या’ मगरीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अस्पष्ट

Posted by - August 18, 2022 0
सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे – ब्रम्हनाळ नदी काठावर आढळलेली अजस्त्र मगर मृतावस्थेत सापडली आहे. वन विभागाने ती मगर मृत…

RAIN UPDATE : राज्यात कोसळणाऱ्या पावसाने धरण पाणी पातळीत वाढ ; नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Posted by - August 9, 2022 0
RAIN UPDATE : राज्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने वीर धरण ,भामा आसखेड धरण ,आणि गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्र मध्ये चांगला…

आकुर्डीत पालखी आगमनापूर्वी विकासकामांसाठी तरतूद करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Posted by - May 19, 2022 0
पिंपरी- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात 21 जून रोजी शहरात येत आहे. दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे…

VIDEO : सावधान..! QR कोड स्कॅन करताय ? QR कोड म्हणजे नेमकं काय ? कशी होते फसवणूक ? वाचा सविस्तर

Posted by - August 10, 2022 0
डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार होत असले तरी धोक्‍याची घंटाही तितकीच मोठी आहे. थेट खात्यातून रक्कम जेव्हा जाते तेव्हा त्याची तीव्रता…
Shri Tulshibag Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *