लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे ; आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

145 0

मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि.२८ सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे, यानिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share This News

Related Post

अंनिसच्या अध्यक्षपदावरून वाद चव्हाट्यावर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आक्षेप

Posted by - January 29, 2022 0
पुणे- संघटनेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता यांनी 7 कोटींचा…

शिंदे गट आणखी मजबूत व्हावा हीच इच्छा -शिवाजीराव आढळराव पाटील

Posted by - September 4, 2022 0
पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना…

समाजातील सर्व घटकांनी मेट्रोने प्रवास करावा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

Posted by - March 6, 2022 0
पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे…

BIG BREAKING : ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने VIDEO

Posted by - November 15, 2022 0
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाला आहे. ठाण्याच्या किसन नगरमध्ये…

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा जन आक्रोश मोर्चा

Posted by - May 30, 2022 0
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊर गावातील आदिवासी बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला आहे. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी चार हजार आदिवासी बांधव रस्त्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *