Sanjay Raut

अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”, समृद्धीवरील अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

3549 0

बुलढाणा:बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसला आग लागून २६ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला.या अपघातावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्ग हा शापित झाला आहे असून, २६ प्रवाशांचा होरपळून मुत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. हा अपघात का झाला यांच्या खोलात जावं लागेल ,असेही संजय राऊत म्हणाले.

समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतले. त्या सर्व गोष्टी तपासने गरजेचे आहे. दुर्दैवाने या महामार्गावर जे अपघात घडत आहेत. लोकं मृत्यूमुखी पडत आहेत. हे चांगले नाही असे राऊत म्हणाले.

समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला असून, वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली आहे. पण त्यासंदर्भात काहीही होतांना दिसत नाही. समृद्धी महामार्गासाठी अनेकांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू मला त्या रस्त्यामध्ये दिसतात. म्हणून तर महामार्गावर अपघात होत नाहीत ना? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Share This News

Related Post

Akola News

Akola News : मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - June 6, 2024 0
अकोला : राज्यात अपघाताचे प्रमाणात (Akola News) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि…

… तर तुमचं पॅनकार्ड होणार बाद; आयकर विभागाचा नागरिकांना इशारा

Posted by - November 21, 2022 0
पॅनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पॅन आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता लिंक प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास…

नोरा फतेहिच्या डान्स परफॉर्मन्सला बांगलादेशमध्ये मनाई; कारण वाचून चकित व्हाल

Posted by - October 18, 2022 0
नोरा फतेही एक वर्साटाइल डान्सर आहे. विशेष करून बेली या डान्सच्या प्रकारासाठी प्रसिद्ध असलेली ही सुंदर अभिनेत्री बॉलीवूडमध्ये तर प्रसिद्ध…
Crime

धक्कादायक : कुऱ्हाडीने वार करून दोन अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपावर घातला दरोडा ; थरकाप उडवणारा व्हिडिओ

Posted by - August 23, 2022 0
पुणे : पुण्यातील न-र्हे भागामध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी थेट पेट्रोल पंपावर दरोडा घातला. या दरोडेखोरांकडे एक कुऱ्हाड होती. या कुऱ्हाडीचाच…

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सर्वांगीण विकास उपक्रम ; विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रशिक्षण

Posted by - August 13, 2022 0
आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. पुन्हा एकदा शाळांमध्ये विविध उपक्रम पुन्हा रंगू लागले आहेत. काल माध्यमिक विद्यालय, काशिग येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *