#MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; आतापर्यंत काय घडलं ?

471 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आत्तापर्यंत हे प्रकरण व्हेकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण होतं. 16 तारखेला झालेल्या सुनावणी नुसार राज्यातील सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, जस्टीस एम. आर. शहा, जस्टीस कृष्णमुरारी, जस्टीस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिंहा यांच्या घटनापिठासमोर गेल्या आठ दिवसांपासून नियुक्तीवाद सुरू असून आता तीन दिवसांच्या सुनावणीमध्ये नक्की काय घडतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये आज पासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे की पाच न्यायाधीशांच्याकडेच ठेवायचं, असा निर्णय देखील आज घेतला जाणार असल्याचं समजत आहे.

ठाकरे गटाने हे प्रकरण सात जणांच्या घटनापिठाकडे सोपवण्याची मागणी केली होती. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का ?असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना केला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने यावर काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे आता हे प्रकरण सात जणांच्या घटना पिठाकडे देण्याचा निर्णय घेतला जाणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

पुणे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद… पाहा VIDEO

Posted by - September 7, 2022 0
पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा येत्या रविवारी 11 सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे. लोहगाव, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, कल्याणीनगर,…

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Posted by - February 28, 2023 0
पुणे : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या…

कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *