श्रद्धा वालकर सारख्या आणखी बळी जाऊ नयेत यासाठी समाजाने आणि कुटुंबाने सतर्क राहण्याची आवश्यकता : डॉ. नीलम गोऱ्हे

239 0

वसई : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या श्रध्दा वालकर या मुलीच्या झालेल्या निर्घृण खुनाची घटना अत्यंत वाईट आणि निंदनीय आहे. आज या मुलीच्या वडिलांना भेटले असता त्यांनी याबाबत काही माहिती दिली. त्यांच्याशी बोलले असता त्यांनी या मध्ये ही मुलगी गेल्या काही दिवसापासून या मुलाच्या संपर्कात होती. मात्र तिचा अलीकडच्या काळात कुटुंबीयांसोबत संवाद मात्र कमी झाला होता.

स्वेच्छेने तिने या मुलासोबत राहण्याचा घेतलेला निर्णय आज तिच्या जिवावर बेतला. हे पाहता आज राज्यातील सर्व स्तरातील कुटुंबे आणि पालकांनी याबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या कुटुंबात विशेषतः मुलांशी नियमित संवाद असणे अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

आज त्या वसई परिसरातील या मुलीच्या घरी तिच्या पालकांची भेट घेतली. त्या आधी त्यांनी माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी पुढील मागण्या केल्या :
१. या घटनेतील आरोपीवर लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावे.
२. सदर प्रकरणाचा निकाल येत्या सहा महिन्यात लावून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जावी.

त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटनामध्ये मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. हे पाहता अशा बाबींचा पालकांनी विचार करणे आवश्यक आहे. काही समस्या असतील तर याबाबत कौटुंबिक समुपदेशन महत्त्वाचे आहे. या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा तपास अतिशय कार्यक्षमपणे केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

यावेळी शिवसेना पदाधिकारी जिल्हा संघटीका किरण चेंदवणकर, माझी शहर प्रमुख उदय चेंदवणकर तालुका संघटक प्रभा सुर्वे, शहर संघटक जसिंथा फिंच, श्रद्धा जाधव, उपशहर संघटक रुचिता विश्वासराव, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, उप तालुकाप्रमुख सुनील मुळे, शहर प्रमुख संजय गुरव, विभाग संघटक प्रियांका निकम, उपशहर प्रमुख शाशिभूषण शर्मा, सूरज शिरोडकर, तालुका प्रमुख स्वप्नील बांदेकर आणि सहायक पोलिस अधिक्षक प्राजक्ता बडे, पोलिस निरीक्षक संपतराव पाटील, तपास अधिकारी सचिन सानप आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

राजेश पाटलांची उचलबांगडी ! शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त ( VIDEO )

Posted by - August 16, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून आता त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात…
RASHIBHAVISHY

तूळ राशीच्या लोकांनी आयुष्याकडे नकारात्मकतेने पाहणे थांबवा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - December 27, 2022 0
मेष रास : आज मन उडू उडू पाहणार आहे दिवस उत्तम प्रत्येक गोष्ट मनासारखे घडेल अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहत…

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान-डॉ.नीलम गोऱ्हे

Posted by - July 10, 2022 0
पुणे :श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा…

खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघा सराईतांना अटक

Posted by - May 10, 2022 0
पुणे- खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली.  रणजित…

रेल्वेमध्ये पेट्रोल ओतून प्रवाशांना जिवंत जळणाऱ्या नराधमाच्या रत्नागिरीत आवळल्या मुसक्या

Posted by - April 5, 2023 0
केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *