… तर तुमचं पॅनकार्ड होणार बाद; आयकर विभागाचा नागरिकांना इशारा

266 0

पॅनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पॅन आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता लिंक प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास आयकर विभागाने नकार दिला आहे.

सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सरकारने यापूर्वीच पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. आधार पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. गेल्या काही महिन्यांपासून पॅन आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता लिंक प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास आयकर विभागाने नकार दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ३० जूनपासून आधार पॅनशी लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारला होता.

दंड भरल्याशिवाय कोणीही पॅन आधारला लिंक करू शकणार नाही. ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार पॅन लिंक प्रक्रिया सुरू राहिल त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. ज्या नागरिकांचे पॅन कार्ड ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले जाणार नाही असे सर्व पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ब अंतर्गत तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे जाऊन तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.

तुम्ही अजूनही पॅनकार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड बाद करण्यात येईल. असे झाल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतील. त्यामुळे आजच आपले पॅनकार्ड लिंक करा.

Share This News

Related Post

‘इंद्राणी बालन फौंडेशन’च्यावतीने लोणी गावासाठी रुग्णवाहिका; आठ गावांना होणार फायदा

Posted by - November 17, 2022 0
पुणे : पुण्यापासून काश्मिरपर्यंत विविध सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या इंद्राणी बालन फौंडेशन (पुणे) आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने आंबेगाव…

BREAKING : पुण्यातील इंदापूरमध्ये 3500 फूट उंचीवरून कोसळलं कार्गो विमान …

Posted by - July 25, 2022 0
इंदापूर : पुण्यातील इंदापूर मध्ये एक कार्गो विमान कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर…

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड-२०२२’ अभय योजना जाहीर

Posted by - March 21, 2022 0
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर,…

मंचर-भीमाशंकर रोडवर ओढ्याचा पुल खचल्यामुळे वाहतुकीत बदल ; परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी (PHOTO)

Posted by - August 8, 2022 0
पुणे ग्रामीण : घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंचर-भीमाशंकर रोडवर शिनोली गावचे हद्दीत नेवाळवाडी फाटा येथे ओढ्याचा पुल खचल्यामुळे एकेरी वाहतूक…

ऐश्वर्याचा लिप किस करतानाचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल; यूजर म्हणाले, “हे चांगलं नाही…!”

Posted by - November 16, 2022 0
मुंबई : ऐश्वर्या रॉय ही एक विश्वसुंदरी आहे. तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका करून आपले अभिनय कौशल्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *