‘RSS संघराज’ Facebook Page च्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी ; सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी , रा.स्व.संघाची मागणी

412 0

पुणे : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार व आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे.

पोलीस व सायबर क्राइम विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली, असून पोलिस यंत्रणांनी तपास सुरू केला असल्याची माहिती श्री. करपे यांनी दिली. रा. स्व. संघ व संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुकवर `RSS संघराज` नामक फेसबुक पेज व इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे.

त्यासोबतच कै. बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची टिप्पणी करीत धादांत खोटा व अपप्रचार करणारा व हेतुपुरस्सरपणे संघाची बदनामी करणारा मजकूर व्हायरल केला जातो आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही श्री. करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.

`RSS संघराज` नामक फेसबुक पेज हे बनावट असून रा. स्व. संघाकडून वा स्वयंसेवकांकडून असा कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला गेलेला नाही. रा.स्व. संघ व संघ स्वयंसेवकाची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे. पोलिस व संबंधीत सायबर यंत्रणांनी याची दखल घेत चौकशी करावी व तातडीने कारवाई करावी अशी मागणी रा.स्व. संघाचे महानगर कार्यवाह श्री. महेश करपे यांनी केली आहे.

Share This News

Related Post

घरातील दुःख, दारिद्र्य निवारणासाठी ‘वैभव लक्ष्मी व्रत’ ; पूजाविधी ; शुभ वेळ ; फलप्राप्ती

Posted by - October 12, 2022 0
चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस आणि पुन्हा वाईट दिवसानंतर चांगला दिवस हे तर आयुष्याचे चक्रच आहे. उगवत्या सूर्याला देखील अस्त असतोच.…

राष्ट्रीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘जलसमृद्ध ग्रामपंचायत आणि स्वच्छ गाव’ या विषयावर चर्चा

Posted by - September 23, 2022 0
पुणे : भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय…

काहीतरी चटपटीत हवंय आणि झटपटही…? घरच्या घरी असा ‘मसाला पापड’ ट्राय करा

Posted by - November 18, 2022 0
घरी आपण बरेचसे पदार्थ बनवतो. पण रोजच्या जेवणामध्ये असं चटपटीत तरी काय बनवणार ? नक्कीच जेवण बनवणाऱ्याला देखील हा प्रश्न…

अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! होऊ शकते फसवणूक

Posted by - April 26, 2023 0
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार…

‘इंद्राणी बालन फौंडेशन’च्यावतीने लोणी गावासाठी रुग्णवाहिका; आठ गावांना होणार फायदा

Posted by - November 17, 2022 0
पुणे : पुण्यापासून काश्मिरपर्यंत विविध सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या इंद्राणी बालन फौंडेशन (पुणे) आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने आंबेगाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *