धक्कादायक माहिती : 2012 ते 2022 या दहा वर्षांमध्ये संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण

621 0

पेशंट राइट्स फोरम या संस्थेने आरटीआय कायद्या अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात 2012 ते 2022 या दहा वर्षात संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समजते आहे. त्याचबरोबर अनेकांना हिपेटाइटिस बी आणि सीची देखील लागण झाल्याचं उघड झालं आहे.

यासंदर्भात पेशंट राइट्स फोरमचे राज खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नागपूरमध्ये 12 थैलेसेमियाच्या रुग्णांना संक्रमित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली होती. हे सर्व रुग्ण दहा वर्षाखालील होते. तर पाच वर्षाच्या दोन निष्पाप मुलांचा मृत्यू देखील ओढावला आहे.

त्यानंतर दहा वर्षात एचआयव्ही झालेल्या रुग्णांची माहिती मागवण्यात आली होती. या माहितीच्या आधारे दहा वर्षात संक्रमित रक्तामुळे 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

Share This News

Related Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रोषणाई; स्वातंत्र्य सेनानींनी दाखवला पंजाब मेलला हिरवा कंदील

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने 18.7.2022 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आयकॉनिक सप्ताहाची दिमाखदार…

‘शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या’ मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप; संभाजीराजे पक्षप्रवेश करणार ?

Posted by - May 22, 2022 0
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ वर या’ असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवला आहे. संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये…

महत्वाची बातमी ! रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांचा दापोली पोलीस ठाण्यात ठिय्या

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी निघाले. दापोलीत दाखल…

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत…

GIRISH MAHAJAN : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा

Posted by - September 22, 2022 0
पुणे : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *