शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्या, महापौर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

373 0

पुणे- कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’

शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा !

◆ मिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिकेचा स्वागत कक्ष असणार

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात यावी.

◆ मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार

◆ पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

◆ शिवजंयती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.

◆ शिवजयंतीबाबत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीकरिता राज्य शासनाकडून नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी.

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी येणार्याा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे.

◆ मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात.

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर

Posted by - May 5, 2022 0
पुणे- आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिक व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिक या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ज्वलंत अभिमान असणारे ज्येष्ठ…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…

Sasoon Hospital : ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; 6 जणांना बाहेर काढण्यात यश

Posted by - November 3, 2023 0
पुणे : दिनांक 3\11\2023 रोजी दुपारी 11 वाजून 50 मिनिटे यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे…
Shivajirao Adhalarao Patil

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Posted by - March 23, 2024 0
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. आढळराव…
Pune PMC Water Supply News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - May 22, 2024 0
पुणे : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांसाठी (Pune News) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *