सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

188 0

बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपने तर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Share This News

Related Post

धक्कादायक : ब्रेक फेल झाल्यामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे झाला नवले ब्रिजवरील अपघाताचा थरार ! वाचा सविस्तर

Posted by - November 21, 2022 0
पुणे : रविवारी रात्री अपघातांचा पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला. पण हा अपघात छोटा-मोठा नाही,…

Safe India Hero Plus Award : अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचा मुंबईत सत्कार

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : आग असो वा आपत्ती अशावेळी कर्तव्य बजावत नागरिकांच्या जिविताची व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी चोख बजावणारे असे हे…

तेच-तेच टोमणे आणि तोंडाची वाफ !; पुण्याच्या माजी महापौरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Posted by - May 15, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता.14) मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या…

#GOLD RATE TODAY : लग्नसराईत दिलासादायक बातमी; सोन्या-चांदीचे दर घसरले ; आजचे दर पहाचं

Posted by - February 27, 2023 0
महाराष्ट्र : आजच्या बुलियन्स वेबसाईटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटचा सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये झाला आहे.…

मोठी बातमी ! केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - May 18, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला १४…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *