पुणेरी महिलांकडून रामदेवबाबांना साडी-चोळीचा आहेर; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिला आक्रमक

366 0

पुणे : योग गुरु रामदेव बाबांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांकडून रामदेव बाबांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. 

त्यातच आज पुण्यात काँग्रेसच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रामदेव बाबांना पोस्टाने चक्क साडी,चोळी,टिकल्या आणि गजराचा आहेर पाठवलेला आहे आणि हे सगळं परिधान करून रामदेव बाबांनी योगासने करावी असं मत देखील मांडलेला आहे

यामध्ये काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या शहर उपाध्यक्षा ॲड. मोनिका खलाणे यांनी पुढाकार घेत रामदेव बाबांना हा आहेर पाठवत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आज केलेला आहे.

तसेच रामदेव बाबांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांच्यासमोर असे वक्तव्य केल्याने अमृता फडणवीस यांना संताप का आला नाही?त्यांनी त्यांच्यासमोर महिलांचा अपमान होताना कसा सहन केला? असा सवाल देखील मोनिका खलाणे यांनी आता उपस्थित केलाय

Share This News

Related Post

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022 0
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार…

हृदयनाथ मंगेशकरांनी मारली थाप आणि मोदींनी सोडला साप..? (संपादकीय)

Posted by - February 11, 2022 0
पहिली थाप (पं. हृदयनाथ मंगेशकर) : ‘… सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला चाल लावली म्हणून आपली आकाशवाणीची नोकरी गेली दुसरी…

मनाची आंघोळ : नात्यांमध्ये दुरावा येतोय…? फक्त प्रेम नाही तर ‘ही’ भावना देखील आहे महत्त्वाची…

Posted by - August 12, 2022 0
मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव…

पुण्यात मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादी देणार ‘असे’ उत्तर

Posted by - April 15, 2022 0
पुणे- मनसेच्या हनुमान चालीसा वाजवण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. उद्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसे पुण्यातील खालकर चौकातील हनुमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *