पुणे : काल राञभरात आगीच्या दोन मोठ्या घटना; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण, जिवितहानी टळली

828 0

पुणे : काल मध्यराञी १२•१० वाजता (दिनांक १३•०१•२०२३) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सिहंगड रस्त्यावर राजाराम पुल येथे एमएनजीएल कंपनीची गॅस पाईपलाईनने पेट घेतला असून मदत पाठवा. त्याचवेळी जनता व एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले व त्याचवेळी एमएनजीएल कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसताच जवानांनी प्रथम सतर्कता बाळगत पाण्याचा मारा फवारणी (स्प्रे) स्वरुपात सुरू करत फोमचा ही वापर करण्यात आला. त्याचवेळी अचानक एकाच चौकामधे तीन ठिकाणी आग पसरल्याने धोका निर्माण झाला असल्याने अग्निशमन मुख्यालयातून अजून एक अग्निशमन वाहन व जंम्बो वॉटर टँकरची अतिरिक्त मदत मागवण्यात आली. तसेच सदर ठिकाणी वायुदाब हा १२ बार असल्याचे एमएनजीएल कंपनीच्या अधिकारयांनी सांगितले व तो दाब हळूहळू कमी करत राजाराम पुल व पर्वती जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य झडप बंद केला असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले.

त्यानंतर तीन ही ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला आणि वायुदाब कमी होत पहाटे चार वाजता ०२ बार वायुदाब झाल्याने आगीचे प्रमाण कमी होत दलाच्या जवानांनी आग पुर्ण विझवत पुढील धोका टाळला. सुदैवाने या घटनेमधे कोणी जखमी झाले नसून कुठलीही जिवितहानी झाली नाही. सदर ठिकाणी महावितरणकडून खोदाईचे काम सुरु असताना ही घटना घडली असा प्राथमिक अंदाज आहे.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, गजानन पाथ्रुडकर, पंकज जगताप, सुभाष जाधव व तांडेल राजाराम केदारी, अनंता जाधव, संदिप घडशी व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, महेंद्र सकपाळ, शैलेश दवणे यांनी सहभाग घेत मोठा अनर्थ टाळला.

काल राञी ११•१० वाजता (दिनांक १२•०१•२०२३) नरहे धायरी रस्ता, भोसले इंडस्ट्रीज येथे आग लागल्याची अग्निशमन नियंत्रण कक्षात वर्दि मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. त्याचवेळी पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून ही वाहन पाठविण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या ०२ गोडाऊनमधे आगीच्या मोठ्या ज्वाळा असून आग मोठी असल्याचे जवानांच्या निदर्शनास येताच मुख्यालयातून अतिरिक्त मदत मागवण्यात आली. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरु करुन आग विझवण्याचा प्रयत्न करीत आतमधे कोणी अडकले आहे का याचा ही शोध घेतला. आतमधे कोणी अडकले नसल्याची खाञी करून पुढे सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पहाटे आग पुर्ण विझवली. तसेच शेजारीच असणारया दोन उंच इमारतीकडे आग कशी पसरणार नाही याची दक्षता घेत जवानांनी आपले कर्तव्य चोख बजावले.

या आगीमधे दोन भंगार मालाचे गोडाऊन पुर्ण जळाले असून आतमधे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य असल्याचे निदर्शनास आले. तसेच शेजारील दोन इमारतींचे ही काही प्रमाणात नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १० अग्निशमन वाहने व काही खाजगी पाण्याचे टँकर आणि जेसीबीचा वापर केला गेला.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रभाकर उम्राटकर, प्रकाश गोरे तसेच तांडेल पांडुरंग तांबे व जवान नितिन मोकाशी संजू चव्हाण व इतर जवानांनी सहभाग घेतला. सदर घटनेत कोणीही जखमी वा जिवितहानी नाही.

Share This News

Related Post

Kedar Dighe : शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले केदार दिघे कोण ? (VIDEO)

Posted by - August 4, 2022 0
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी त्यांच्याविरुद्ध…

CRIME NEWS : मैत्रिणीपासून सुटका करून घेण्यासाठी अपहरण करून केले असे कृत्य; आरोपी पत्रकार ताब्यात

Posted by - November 6, 2022 0
पिंपरी चिंचवड : मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून एका पत्रकाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करून नदीपात्रामध्ये…

महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड : सामाजिक कार्यातून राहूल बोरोलेंनी निर्माण केलं अस्तित्व

Posted by - November 8, 2022 0
आजच्या तरूणांसमोर उद्योग, व्यवसाय करणे म्हणजेच आव्हाने ठरत आहे. परंतु आव्हानांनाही संधी मानून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे काही युवक…

वातावरण बदलामुळे घरात सातत्याने होते आहे आजारपण ? फॉलो करा या घरगुती टिप्स

Posted by - September 24, 2022 0
गणपती झाल्यानंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस झाला. सध्या वातावरण मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. पावसामुळे आता वातावरणामध्ये गारठा देखील…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना; अर्ज भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

Posted by - September 22, 2022 0
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता १ली ते १० वी वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *