PUNE CRIME : व्यवसायिकाचे अपहरण प्रकरणी कुप्रसिद्ध गुन्हेगार गज्या मारणे, रुपेश मारणे, पप्पू घोलपसह 14 जणांवर MCOCA अंतर्गत कारवाई

690 0

पुणे : व्यवसायिकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध गुन्हेगार गज्या मारणे याच्यासह टोळीतील 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळक्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गज्या मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई पुणे महामार्गावर रॅली काढली होती. यावरून त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. वर्षभराच्या स्थानबद्धतेच्या कारवाईनंतर आता सुपारी घेऊन धमकावल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार सिंहगड रोड येथे राहत असून त्यांचा रियल इस्टेट आणि शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. 7 ऑक्टोबर रोजी तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांना आयसीआयसीआय बँक कात्रज येथे असताना काही इसमांनी जबरदस्तीने अपहरण करून गाडीमध्ये बसवले. मुंबई बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळ्या गाडीमध्ये त्यांना फिरवण्यात आलं. त्यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. त्यांना मारहाण देखील करण्यात आली.

तसेच त्यांच्याकडे असलेली गाडी जबरदस्तीने काढून घेऊन वीस कोटींची मागणी करण्यात आली होती. तर हे 20 कोटी न दिल्यास त्यांच्या हत्येची देखील त्यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी आता या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत सन 2022 या चालू वर्षांमध्ये करण्यात आलेली ही 39 वी कारवाई असून आत्तापर्यंत एकूण 102 कारवाई करण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

देशात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला होणार सुरुवात

Posted by - March 14, 2022 0
राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाचा तिसरा ‘बूस्टर डोस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशात आता…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…

मानसिक आरोग्य : लग्न ठरलंय ? पण मनाची घालमेल होते; अनामिक भीती वाटते मग, ‘या’ टिप्स वाचाच

Posted by - December 24, 2022 0
सध्या लग्नसराई सुरू आहे. जे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, त्यांना एक अनामिक भीती वाटत असते. ज्यांची लग्न झाली आहेत.…

SPECIAL REPORT : महाराष्ट्रात या वर्षी होणार 4 दसरा मेळावे ; कोणते ते पाहा..

Posted by - October 1, 2022 0
SPECIAL REPORT : राज्यात शिवसेना आणि शिंदेगटात दसरा मेळाव्यावरून घमासान पाहायला मिळाल्यानंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना शिवाजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *