पुणे : भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलासोबत भाऊबीज साजरी

175 0

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाचे जवानांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे 27 वे वर्षे होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरक,र अभिनेत्री पूजा पवार , जयमाला इनामदार ,शिक्षणातज्ञ डॉ.राजेंद्र हिरेमठ, नगरसेवक श्रीनाथ भिमाले अजय खेडेकर, विशाल धनवडे,रवींद्र धंगेकर, भरत वैरागे,राजेंद्र शिळीमकर,प्रविण चोरबेले,सामाजिक कार्यकर्ते अजय भोसले, सौ तृप्ती देसाई,शिरीष मोहिते, आबासाहेब साळुंखे, हेमंत गोसावी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार ,गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक दादा चव्हाण, सुप्रसिद्ध गायक इक्बाल दरबार, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक पटेल,कायदे तज्ञ नरसिंह लगड,शाहीर हेमंत मावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई यांनी बोलताना अग्निशमन दलाच्या कर्तव्य तत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेली 26 वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.अग्निशमन दला चे प्रमुख श्री देवेंद्र पोटफोडे यांनी गेली अनेक वर्षे अग्निशमन दलाचे जवानांची आठवण ठेवून हा कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल संयोजकां चे कौतुक करून यंदा फटाक्यांमुळे आग लागण्याचे घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले .सर्व समाज कुटुंबीयांसमोर दिवाळी साजरा करत असताना आमच्या जवानांना मात्र सेवेत तत्पर राहावे लागते या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठान करत असलेले या उपक्रमाबद्दल आम्हाला कुटुंबीय समवेत दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळते असे सांगितले. मुस्लिम बांधवांच्या वतीने या प्रसंगी शिरखुरमा चे वाटप करण्यात आले.

गेल्या वर्षभर स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक दुर्घटनांमध्ये काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. आशिष जराड यांनी सुत्रसंचालन केले. डॉ.शंतनु जगदाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
मुख्य अग्निशमन केंद्र, गंज पेठ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

Share This News

Related Post

Pimpri Video

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Posted by - April 7, 2024 0
पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी चिंचवड या भागात बऱ्याच वेळा गाव गुंडांची दहशत (Pimpri Video) पाहायला मिळते. कधी हातात कोयता…
Ketki Chitale

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Posted by - May 23, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना दिसत…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी

Posted by - July 19, 2022 0
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी…

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचना आज प्रसिद्ध होणार

Posted by - June 2, 2022 0
जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ३ व परिशिष्ट ३(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा…

घोडीवर मांड ठोकून डॉ. अमोल कोल्हे बैलगाडी शर्यतीत, दिलेला शब्द पाळला

Posted by - February 16, 2022 0
पुणे- बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार डॉ. यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण माजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *