लॉकडाऊननंतर पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पुन्हा दीड कोटींवर पोहोचले

104 0

पुणे- कोरोना काळ व लॉकडाऊन नंतर प्रथमच ‘पीएमपी’चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांहून अधिक तर उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले आहे. अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनपूर्वी २४ फेब्रुवारी २०२० ला ‘पीएमपी’ला मिळालेले उत्पन्न १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त होते. त्यानंतर जवळपास २ वर्षांनी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५४७ इतक्या बसेस संचलनात होत्या. तसेच या दिवशी महामंडळाला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

कोरोनामुळे ‘पीएमपी’चे बस संचलन अत्यावश्यक सेवा वगळता २ सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होते. ३ सप्टेंबरपासून बससेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एप्रिल ते मे दरम्यान ‘पीएमपी’ला पुन्हा बस बंद ठेवाव्या लागल्या. दोन्ही लॉकडाऊननंतर पीएमपीकडून बस सुरु करण्यात आल्या. बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्याने १० जानेवारी २०२२ पासून बस संचलनात पुन्हा कपात करावी लागली होती.

मात्र, आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने ‘पीएमपी’ची वाटचाल पहिल्या लॉकडाऊनपूर्वी असलेल्या दैनंदिन प्रवासी संख्येकडे व उत्पन्नाकडे होऊ लागलेली आहे. सध्या पीएमपीच्या दररोज सुमारे १ हजार ५४० पेक्षा जास्त बसेस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी ‘पीएमपी’च्या बससेवेचा वापर करण्याचे आवाहन दत्तात्रय झेंडे यांनी केले आहे. प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा या सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पीएमपीएमएलकडून मागील एक वर्षापासून ३० नवीन ग्रामीण मार्ग सुरू करण्यात आले आहेत.लॉकडाऊननंतर प्रवासी पीएमपी बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीची बससेवा पूर्वपदावर येत असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

चिनी लोन ॲप वरून लोन घेताय सावधान! ही माहिती ठरेल तुमच्यासाठी उपयुक्त

Posted by - September 18, 2022 0
चिनी लोन ॲप्सवरून कर्ज घेतल्यानंतर त्याच्या जाळ्यात अडकल्याची शेकडो प्रकरणं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. काहींनी तर कर्जाचे हप्ते…

ब्रेकिंग न्यूज, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा

Posted by - March 15, 2022 0
मुंबई- मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची ही घ्या यादी

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर विधान परिषदेतील विजयानंतर सावरलेल्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, नगरविकास मंत्री…

ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - July 20, 2022 0
पुणे : महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झालं होतं. मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने व राज्यातील तमाम…

आकाशगंगेतील ‘या’ ताऱ्यावरून 82 तासात आले तब्बल 1863 रेडिओ सिग्नल ; एलियन खरंच असावेत का ?

Posted by - September 26, 2022 0
आपल्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त आकाशगंगेमध्ये असे अनेक ग्रह आहेत,ज्यावर मनुष्यासारखे जीव असल्याचा दावा शास्त्रज्ञ नेहमीच करत असतात. आत्तापर्यंत अनेक वेळा संशोधन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *