‘PBCL’ Season 2 : पुनीत बालन सेलिब्रिटी लीगमध्ये मराठी कलाकारांवर लागली लाखांची बोली ; लिलाव सोहळा दिमाखात संपन्न

226 0

मुंबई : पुनीत बालन सेलिब्रिटी लीग (PBCL) या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीजनचा लीलाव १०० हून अधिक सेलिब्रिटिंच्या उपस्थितीत, मुंबई येथे ताज हॉटेलमध्ये संपन्न झाला. (PBCL) पिबिसीएलच्या अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव श्री. कैलास गायकवाड, सौ. जान्हवी धारीवाल बालन आणि महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे, आणि पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले, आणि राहुल क्षीरसागर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला.

११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये १६ नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व शरद केळकर आणि पन्हाळा जॅगवार्सचे नेतृत्व महेश मांजरेकर करणार आहेत.

मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून रोज प्रेक्षकांना भेटणाऱ्या १०० हून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञावर ६ कॅप्टन्सने बोली लावली. एखाद्या खेळाडूसाठी दोन कॅप्टन्समध्ये रंगलेली चढाओढ जेवढी चुरशीची होती तेवढीच रंजकही होती. या सोहळ्यात मराठी कलाकारांवर लाखो रुपयांच्या (पॉइंट्स स्वरूपात) बोली लागल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुनीत बालन सेलिब्रिटी लीग साठी कलाकारांचा लिलाव संपन्न झाला.

Share This News

Related Post

Casting Vibe : प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात पदार्पण देणारे नवीन व्यासपीठ !

Posted by - October 15, 2022 0
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर टीव्ही आणि ओटीटी माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत…
India vs Pakistan

India vs Pakistan : ‘या’ कारणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताला हरवणे पाकिस्तानसाठी आहे अशक्य

Posted by - October 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला (India vs Pakistan) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19…

पुणेरी महिलांकडून रामदेवबाबांना साडी-चोळीचा आहेर; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिला आक्रमक

Posted by - November 28, 2022 0
पुणे : योग गुरु रामदेव बाबांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये…

बीड : अंबाजोगाईत ट्रक-जीपचा भीषण अपघात; सात प्रवासी जागीच ठार

Posted by - April 23, 2022 0
बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले…

भारतरत्न लता मंगेशकर-दीदी यांचा सुवर्णांकित पुतळा बद्रिनाथधाम येथील सरस्वती मंदिरात स्थापन करणार!

Posted by - August 8, 2022 0
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी-देहू) व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्री बद्रिनाथधाम, उत्तराखंड जवळील माणा ह्या गावी श्री सरस्वती नदीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *