GANAPATI

अंगारकी चतुर्थी : या दिवशी श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सायंकाळी करा हा उपाय ; वाचा महत्व , कथा

257 0

अंगारकी चतुर्थी : मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव “अंगारक” हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते.

See the source image

या दिवशी सायंकाळी ११, २१ किंवा आपल्या इच्छेप्रमाणे गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे . घरात आपला आवाज सर्वांच्या कानावर पडेल अशा ठिकाणी आसनावर बसून हे पाठ करावे . यामुळे घराव येणारे विघ्न अवश्य दूर होतील.

गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला ‘मंगलमूर्ती” असे नाव मिळाले.

गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात. भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात. अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

Share This News

Related Post

Shri Guruji Talim Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री गुरुजी तालीम गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

निधन वार्ता : ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे निधन

Posted by - October 27, 2022 0
पुणे : ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवार (२७ ऑक्टोबर) रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या…

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर या टिप्स फॉलो करा

Posted by - June 18, 2022 0
सोशल मीडिया, चॅट, कॉलिंग यामुळे स्मार्टफोनचा वापर खूप केला जातो. साहजिकच फोनची बॅटरी लवकर संपते. त्यासाठी काही सोपे उपाय केल्यास…

वास्तू तथास्तु…! घरात अस्वस्थ वाटते आहे ? ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा , घराला येईल घरपण… 

Posted by - July 28, 2022 0
वास्तू तथास्तु…! घरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की , घराने आपल्याला आपलंसं करून घ्यावं.  अर्थात त्या घरामध्ये आपलेपणा वाटावा…

SKIN CARE : कोरियन मुलींसारखी चमकदार नितळ त्वचेसाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती फेसपॅक

Posted by - January 17, 2023 0
SKIN CARE : नितळ स्वच्छ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येक मुलीचे स्वप्नच असतं आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल की…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *