नवी दिल्ली : न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी घेतली 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

189 0

नवी दिल्ली : न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी आज देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सरन्यायाधीश उदय लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. उदय लळीत यांनी सरन्यायाधीश म्हणून 74 दिवस काम केले. गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात यांना निरोप देण्यात आला. त्यानंतर बुधवारी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.

न्या.डी.वाय.चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून 13 मे 2016 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. ‘न्यायपालिका याचिका कर्त्यांसाठी न्याय मिळवण्याचे चांगले ठिकाण बनेल यासाठी काम करणार’ असल्याचं यावेळी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसेच ‘देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे देशाचे सोळावे सरन्यायाधीश होते. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत ते सरन्यायाधीश होते. त्यामुळे 37 वर्षानंतर धनंजय चंद्रचूड हे पुन्हा त्याच खुर्चीवर विराजमान होणार आहेत.

Share This News

Related Post

तंबाखू दुष्परिणाम जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा…

अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

Posted by - March 10, 2022 0
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत…

आज काय भाजी करावी विचार करताय ? ढाबा स्टाईल ‘दाल तडका’ असा बनवा सोप्या पद्धतीने

Posted by - November 11, 2022 0
गृहिणींना रोज सतावणारा प्रश्न म्हणजे आज काय भाजी करावी . रोज वेगळा तरी काय तरी करणार. तर मग आज सोप्या…

अखेर! आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा 15 जूनला निश्चित

Posted by - June 6, 2022 0
आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित…

Vice Presidential Election :..”म्हणून आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही “! ; ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेने यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Posted by - July 22, 2022 0
Vice Presidential Election : गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजप पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून , भारताच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *