Murder Mystery : अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ वकिलाचे मारेकरी सापडले

344 0

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून अपहरण करून खून झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील ‘त्या’ वकिलाच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. 31 डिसेंबर रोजी काळेवाडीतील उच्च न्यायालयाचे वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता.

वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या राजेश्वर गणपत जाधव, सतीश माणिकराव इंगळे आणि बालाजी मारुती एलनवर या तीन आरोपींना अटक करण्यात पिंपरी-चिंचवडच्या गुंडाविरोधी पोलिस पथकाला अखेर यश आलं. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी राजेश्वर जाधव याच्या घटस्फोटाच्या प्रकरणाचं कामकाज वकील शिवशंकर शिंदे पाहात होते.

दरम्यानच्या काळात आपल्या पत्नीचे वकील शिवशंकर शिंदे यांच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय राजेश्वर जाधव याला आला आणि त्यातूनच त्यांनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी वकील शिवशंकर शिंदे यांचं त्यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमधून एका टेम्पोतून अपहरण केलं आणि खून केला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील चिन्नमा कोरी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - December 2, 2022 0
पुणे : पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या…

JDU-BJP Alliance Broke : “भाजपने आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला”; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे भाजपवर आरोप

Posted by - August 9, 2022 0
बिहार : पाच वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती तुटली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

TOP NEWS SPECIAL : अष्टविनायक दर्शन , महत्व , इतिहास , दर्शनासाठी हे आहेत मार्ग

Posted by - August 30, 2022 0
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची श्रीगणेश मंदिर आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.…
kasarwadi crime

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

Posted by - April 30, 2024 0
पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून शहरातील कासरवाडी परिसरात बार चालकाने बियरचे पैसे मागितल्याने फुकट्या गाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *