पुणे लोकसभा पोटनिवडणूक मेधा कुलकर्णी लढवणार? म्हणाल्या…

2848 0

पुणे: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधन झाल्यानं पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली असून भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ही जागा लढवण्यासाठी अनेक इच्छुक असल्याच पाहायला मिळत आहेत. 

भाजपमध्ये गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी तर काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची नावं आघाडीवर आहेत तर या जागेवर राष्ट्रवादीनं दावा करत शहराध्यक्ष प्रशांत जगताप देखील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

याच  पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने संधी दिली तर मी पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी मला दिली, ती मी पार पाडली आहे. आधी लोकप्रतिनिधी म्हणून आणि नंतर पक्ष संघटनेतून जनतेचे कामं केली आहेत. आता पक्षाने काही जबाबदारी दिली, तर ती देखील मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत आहे. हे खरं आहे. पक्षाने संधी दिली तर मी निश्चितच पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश पाळला आणि आताही पक्षाने लढण्याचे सांगितले, तर तो आदेश मानून नक्कीच पोटनिवडणूक लढवेन, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.

Share This News

Related Post

गुडघाभर पाणी.. वीजपुरवठा खंडित… साई दर्शनासाठी भाविकांची तारांबळ ; शिर्डी मध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग (पहा फोटो)

Posted by - August 8, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी भाविकांची रिघच लागलेली असते . अशातच पावसानं राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी…

शहरात हलक्या पावसाच्या सरी

Posted by - March 10, 2022 0
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुढील तीन…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…

धक्कादायक : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारीची आत्महत्या

Posted by - August 11, 2022 0
पिंपरी चिंचवड : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारिने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पोलीस कॉन्स्टेबल कविता…
Dhule Bus Accident

भरधाव वेगात बाईक चालवणं पडलं महागात; विजेच्या खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू

Posted by - August 6, 2024 0
पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अनेकदा आपल्या चुकीमुळे इतरांचे जीव धोक्यात घालणारे वाहन चालक आपल्याच चुकीमुळे स्वतःचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *