सुनावणी लांबणीवर…!राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष

175 0

मुंबई :एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशींविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. २७ जूनला झालेल्या सुनावणीच्या वेळी ११ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. या सुनावणीनंतर शिवसेना आणि शिंदे गटाने वेगवेगळय़ा याचिका दाखल केल्या आहेत.                                                शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यातील न्यायालयीन लढाईकडे सर्वाचे लक्ष लागले असताना, सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाला विनंती करणार आहेत.                                                      शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मुद्दय़ांना आव्हान देणाऱ्या याचिका शिवसेनेने केल्या आहेत. अपात्रतेच्या नोटिशींना आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती.                                                                     सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश एऩ व्ही़ रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. या याचिका अन्य कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.                                                                    शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी शिवसेनेने, तर शिवसेनेतील आदित्य ठाकरे वगळता अन्य आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका सादर केल्या आहेत. त्यावर या सर्व ५३ आमदारांनी सात दिवसांत उत्तर सादर करावे, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

 

Share This News

Related Post

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट, वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 4, 2022 0
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
Eknath Khadse

Eknath Khadse : शरद पवारांना मोठा धक्का ! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

Posted by - April 6, 2024 0
जळगाव : राज्याच्या राजकारणाला एक नवे वळण देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजप…
Sunil Mane

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Posted by - March 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे.…

‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न’; अधिकाधिक नागरिकांना बँकींग व्यवस्थेत आणा- केंद्रीय सहसचिव पंकज शर्मा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *