दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

119 0

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. आज यापैकी 38 जणांना शिक्षा सुनावण्यात आली अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

Share This News

Related Post

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून युवासेनेला बळकटी ! ‘या’ 3 शिलेदारांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.…
Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 9, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं…
Supriya Sule

Supriya Sule : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

Posted by - September 11, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चर्चा आहे. या शोचा तिसरा सीझन आपल्याला पाहायला…
Crime

भोसरीत कोयता ‘गँग’चा दोघांवर हल्ला ; 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 3, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील दिघी रोडवर कोयता गँगनं एका तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची शनिवारी रात्री घडली. या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *