महत्वाची बातमी ! रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांचा दापोली पोलीस ठाण्यात ठिय्या

71 0

मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी निघाले. दापोलीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मुरुडला जाण्यास मनाई केली. सुमारे तासभर पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. माझी हत्या करण्याचा कट असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या अनेक कार्यकर्त्यांसह आज सकाळी दापोलीकडे निघाले. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून पोलिसांनी दापोलीत जमावबंदी लागू केली. किरीट सोमय्या आणि त्यांचा ताफा दापोलीला जाण्यासाठी निघाला असता मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलिसांनी सोमय्या यांचा ताफा अडवला.

किरीट सोमय्या यांना दापोलीला जाण्यास मनाई करण्यात आली. त्या संदर्भातील नोटीस त्यांना देण्यात आली. मात्र सोमय्या पोलिसांचा आदेश झुगारून दापोलीला पोहोचले. यावेळी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे सहभागी झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचे जोरदार स्वागत केले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे हातात घेऊन सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोमय्या यांनी ‘अनिल परबचा रिसॉर्ट मी तोडून दाखवणार’ असा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत किरीट सोमय्या, निलेश राणे, नील सोमय्या यांच्यासोबत चर्चा झाली. पोलिसांनी सोमय्या यांना रिसॉर्टकडे जाण्यासाठी मनाई केली. अन्यथा कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिला.

चर्चेनंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवून धरल्या. त्यामुळे संतापलेल्या निलेश राणे आणि किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला.  प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी किरीट सोमय्या यांना विचारणा केली असता त्यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि शिवसेनेचे कटकारस्थान असल्याचा आरोप केला. माझा घातपात होणार असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Share This News

Related Post

खुशखबर ! PMPML मध्ये नोकरीची संधी ; 2 हजार चालक व वाहकांची होणार भरती

Posted by - August 16, 2022 0
पुणे : पुणे शहरातील बेरोजगार तरुणांसाठी फायद्याची बातमी आहे. पीएमपीएमएल प्रशासनाकडून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पीएमपीएमएल प्रशासन लवकरच…

‘पुष्पा’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रक्तचंदनाची खरी कहाणी, काय आहे रक्तचंदन ?

Posted by - January 27, 2022 0
दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘ पुष्पा: द राइज ‘ हा चित्रपट सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची कथा ही…

ऐकावे ते नवलच ! PUBG खेळत खेळत १२ वर्षाच्या मुलगा पोहोचला नांदेडहून नाशिकला

Posted by - May 6, 2022 0
नाशिक- पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट…

पुणे : आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना गौरवार्थ मानधन योजना

Posted by - November 4, 2022 0
पुणे : देशामध्ये १९७५ ते १९७७ या कालावधीत घोषित आणिबाणी कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना गौरवार्थ मानधन देण्याबाबतची योजना पुन्हा…

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *