#कसबा पोटनिवडणूक : भवानी पेठेतील पदयात्रेत महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांना मोठा प्रतिसाद

566 0

पुणे : राजकीय दृष्ट्या जागरूक असणाऱ्या प्रभाग क्र.१७, भवानी पेठ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून भव्य पदयात्रा सुरु झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षांचे असंख्य कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते.

चेतन अगरवाल घरापासून हिंदबाल समाज ते बनकर तलीम रामोशी गेट अशा मार्गाने पुढे जाणाऱ्या या पदयात्रेत तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. फटाक्यांचा दणदणाट, धंगेकरांचे पोस्टर्स व धंगेकर झिंदाबाद घोषणांचा कल्लोळ यामुळे सारे वातावरण निवडणूकमय झाले होते.

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख, रमेश अय्यर, अरुण गायकवाड, सुनील घाडगे, विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, दयानंद अडगळे, यासर बागवे, चेतन अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नलावडे, हरीश लडकत, संजय गायकवाड, प्रदीप गायकवाड, शुभम शिंदे, प्रकाश फुलावरे, फईम शेख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, भाऊ शिंदे, निलेश राऊत, निलेश ढवळे, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, अनिल ठोंबरे, शुभम दुगाने, राजेश राऊत, योगेश खेंगरे हे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शेकडो नागरिकही सहभागी झाले होते.

रामोशी गेट येथून पुढे भवानी माता मंदिर येथे धंगेकरांनी श्री भवानीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तेथे काढण्यात आलेली भव्य रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मार्गात ठिकठिकाणी गणेश मंडळानी त्यांचे स्वागत केले. धंगेकरांनी गणेशाची प्रत्येक ठिकाणी आरतीही केली. दुतर्फा जमलेल्या नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधला. अनेक नागरिक व व्यापारी आपल्या अडचणीदेखील सांगत होते. जागोजागी पाणी, सरबत, चहा दिले जात होते. पुढे दादापीर दर्गा सरळ मार्गे भारत टॉकीज समोर एडी कॅम्प चौक येथे ही पदयात्रा संपली. महाविकास आघाडीच्या झिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेल्यानंतर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

Share This News

Related Post

sharad pawar

राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता -शरद पवार

Posted by - August 28, 2022 0
पुणे:प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही,…

सोलापूर RTO कार्यालयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत व्हेईकल असोसिएशनचे धरणे

Posted by - August 19, 2022 0
सोलापूर : सोलापूर आरटीओ कार्यालयात काम करणारे सुमारे 70 प्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आरटीओतील कामकाज, आर्थिक पिळवणूक तसेच होणाऱ्या त्रासाबाबत…

मोठी बातमी! बंडखोर आमदारांना सीआरपीएफचे जवान सुरक्षा पुरवणार

Posted by - June 26, 2022 0
बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या…

Presidential Election : द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदासाठीच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून द्रौपदी…

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *