झारखंड मधील रोपवे दुर्घटना: 20 तासांनंतरही सुमारे 48 लोक अडकले, बचावकार्यात अडचणी

69 0

झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकूट टेकडीवर रविवारी रोपवे दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. झारखंडच्या सर्वात उंच रोपवेवर झालेल्या अपघातात सुमारे 18 वेगवेगळ्या ट्रॉलींमध्ये 48 लोक अजूनही अडकले आहेत. एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य करत आहे. लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे, मात्र अद्यापपर्यंत लोकांना सुखरूप परत आणण्यात यश आलेले नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रोपवेवरील किमान 12 केबिनमध्ये 50 लोक अजूनही अडकले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर सुमारे 20 तास उलटले तरी 48 हून अधिक लोक अजूनही हवेत लटकले आहेत. या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचताच हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे ट्रॉली हलू लागली आहे आणि ती यातील लोकांच्या जीवावर येत आहे. वर अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे. ट्रॉलीमध्ये लहान मुले, पुरुष आणि काही महिला अडकल्या आहेत. यासोबतच गाईड आणि छायाचित्रकारही अडकून पडले आहेत.

रोपवे चालवणारी एजन्सी ब्लॅक लिस्टमध्ये

झारखंडमधील देवघर येथे रामनवमीनिमित्त त्रिकूट पर्वतावर भटकंती करण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. त्यावेळी काही केबल कार एकमेकांना धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी येथे 2 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. केबिन जमिनीपासून सुमारे 2500 फूट उंचीवर आहे. त्यामुळे कारवाई सुरू करण्यापूर्वी सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे. झारखंडचे पर्यटन मंत्री हफिझुल हसन यांनी सांगितले की, रोपवेचे संचालन करणाऱ्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनला काळ्या यादीत टाकले जाईल.

तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली ?

एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली, ज्यामुळे केबल कारची टक्कर झाली. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. ते म्हणाले की, स्थानिक लोकही एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत.

Share This News

Related Post

गुडघाभर पाणी.. वीजपुरवठा खंडित… साई दर्शनासाठी भाविकांची तारांबळ ; शिर्डी मध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग (पहा फोटो)

Posted by - August 8, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी भाविकांची रिघच लागलेली असते . अशातच पावसानं राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी…

अखेर यासिन मलिकला जन्मठेप; एनआयए कोर्टाने सुनावली शिक्षा

Posted by - May 25, 2022 0
  टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा विभाजनवादी नेता यासीन मलिक याला एनआयए कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय तपास पथकाच्या…

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

Posted by - February 2, 2022 0
बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य…

वजन कमी करण्यासाठी हे पेय तुमच्यासाठी खूप उपयोगी

Posted by - April 26, 2022 0
वजन वाढल्यामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे घेणे,…

VIDEO : हल्लेखोर नरभक्षक ‘T-103 वाघ’ अखेर जेरबंद

Posted by - August 19, 2022 0
चंद्रपूर : चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या टी-103 या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.जून महिन्यापासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *