दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूया नारळाचा चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू

259 0

आजच्या दिवाळी स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत नारळाचं चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू कसे बनवायचे. जिभेवर ठेवताच अगदी सहज विरघळणारे हे लाडू घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतील असे खूप छान बनतात. त्यामुळे या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा…

साहित्य : बारीक रवा, खवलेला नारळ, दुधाची पावडर, तूप, साखर, वेलची, ड्रायफ्रूट्स

See the source image

कृती : सर्वप्रथम बारीक रवा हलका भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घाला, बरोबरीने एका बाजूला एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी आणि दीड वाटी साखर ठेवा. तोपर्यंत साखरेचा पाक तयार होईल.

तुपामध्ये नारळाचा चव घालून एक सारखा परतून घ्यावा हलका गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर (ओबडधोबड कुटलेले ड्रायफ्रूट्स) वेलची पावडर घालून मध्यम आचेवर परतून घ्या. यानंतर यामध्ये तीन मोठे चमचे दुधाची पावडर घाला. आणि भाजलेला रवा घालून सर्व मिश्रण एकसारखे हलवून घ्या.

खमंग असा वास सुटल्यानंतर गॅस बंद करावा. साखरेचा पाक एकतारी झाल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण या पाकामध्ये घालावे आणि मिश्रण चांगले हलवून घ्यावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी तसेच सोडून द्या. हे सर्व मिश्रण कोमट झाल्यानंतर दुधाचा शिपका मारून हाताला तूप लावून छान लाडू वळून घ्या. तयार आहेत ओल्या नारळाचा चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू…

Share This News

Related Post

VIDEO : हल्लेखोर नरभक्षक ‘T-103 वाघ’ अखेर जेरबंद

Posted by - August 19, 2022 0
चंद्रपूर : चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या टी-103 या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.जून महिन्यापासून…

एनडीए सरकारचा आज शपथविधी; नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Posted by - June 9, 2024 0
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आता एनडीए सरकारचा…

मंत्रिमंडळ बैठक : आणीबाणीमधील बंदिवास सोसावा लागलेल्यांना पूर्वीप्रमाणेच मानधन

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : देशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना पूर्वीप्रमाणेच देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

शिरूर तालुक्यात फटाक्याच्या दुकानाच्या परिसरात फटाके उडविण्यावर बंदी

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांनी शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १००…

मोदी सरकारकडून केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज

Posted by - March 7, 2022 0
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *