महत्वाची बातमी : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक,पुणे पदावर नेमणूक

201 0

पुणे : राज्य पोलीस दलातील 30 वर्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची उप्पर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली करण्यात आली होती.

दरम्यान अवघ्या पाचच दिवसात अमिताभ गुप्ता यांची पुन्हा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत . पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आता राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पुणे पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

२१ सेप्टेंबर २०२० रोजी आयपीएस अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला . त्यानंतर पुण्यातील अवैध धंदे , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर देखील वचक बसला . पुण्यात आजपर्यंत 100 हुन अधिक टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८० हुन अधिक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्यांनी सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या या निडर पावलामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे . गणेशोत्सवाच्या आधी शहरातील रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना अटक करून शहरात शांतता स्थापित राहील याची पूर्ण काळजी पुणे पोलिसांनी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.

Share This News

Related Post

#OnePlus 11Rप्रीमियम स्मार्टफोन OnePlus 11R ची प्री-ऑर्डर उद्यापासून सुरू, ‘या’ दिवसापासून सुरू होईल विक्री

Posted by - February 20, 2023 0
वन प्लसने 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटमध्ये त्यांचा प्रीमियम वन प्लस 11 सीरिज अंतर्गत वन प्लस 11 आणि OnePlus…
Vinay Arhana

Lalit Patil : ललित पाटील ड्रग्सप्रकरणी विनय अरहानाला तळोजा जेलमधून घेतलं ताब्यात

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता.…
Pune Ganpati Visarjan

Pune Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ रस्ते असणार बंद

Posted by - September 26, 2023 0
पुणे : अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी (Pune Ganpati Visarjan) पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त…
Maruti Navle

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Posted by - November 29, 2023 0
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर पुणे पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवले…

प्रधानमंत्री यांच्याकडून ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत लाभ जाहीर; जिल्ह्यातील 106 बालकांना पीएम-केअर्स योजनेच्या लाभांचे वितरण

Posted by - May 30, 2022 0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत लाभ जारी केले. यावेळी त्यांनी कोविड-19 मुळे पालक गमावल्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *