20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यास…; संभाजी ब्रिगेडनं दिला हा इशारा

4564 0

२० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यसरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडले होते. व छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून RTE अ‍ॅक्ट २००९ नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती,पाडे,तांडे,वाड्या अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या.त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी,वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे.
या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषत: मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील कारण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने विचार करावा. विद्यार्थीसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकभरती करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात ही विनंती. जिल्हापरिषदेच्या शाळेच्या इमारतींची जी दुरवस्था झाली आहे त्यात सुधारणा करावी, तसेच ग्रामसेवक,तलाठी ते जिल्हाधिकारी, व सरपंच ते खासदार या सर्वांना नियम करा, त्यांची मुले सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतील, म्हणजे सर्व सामान्य लोकांची मुले सुद्धा तिथं शिकतील, असं झाल्यास जिल्हापरिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, सरकारी शाळा टिकवणं हे राज्यसारकारच काम आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये तो आदेश सरकारने त्वरित मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिक्षण कार्यालयात घुसून आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, या संदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने शिक्षण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, पुणे महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, महानगर उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, शहर सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर,सुमित रायकर, निखिल गाडेकर, पर्वती विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा अर्चना गव्हाणे उपस्थित होते.

Share This News

Related Post

भयंकर ! प्रसिद्ध पॉर्नस्टारची क्रूरपणे हत्या ; पोल डान्सचे शूट करायचे म्हणून बांधले हात ; आणि त्यानंतर…

Posted by - September 30, 2022 0
शरीराचा थरकाप उडवेल अशी घटना पॉर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पॉर्नस्टार कॅरल माल्टेसी सोबत घडली आहे. इंडस्ट्रीमध्ये तिला अँजी या नावाने ओळखले जाते.…

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - December 2, 2022 0
पुणे : पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या…

पुणे पोलीस दलात महत्त्वाचे आणि मोठे बदल; 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या पुण्यात बदल्या, वाचा सविस्तर

Posted by - November 8, 2022 0
पुणे : गृह विभागाने राज्यातील पोलीस अधिकारी दर्जाच्या १०४ बदल्या घोषित केल्या आहेत. यामध्ये अप्पर अधीक्षक , पोलीस अधीक्षक यांच्या…

दिल्ली : जॅकलीन फर्नांडिसनंतर नोरा फतेही मनी लॉन्ड्री प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; नोराची दिल्ली पोलिसांकडून सहा तास कसून चौकशी

Posted by - September 3, 2022 0
दिल्ली : तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला तीनच दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात…

इतर मागास वर्गीय समाजावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठा – नाना पटोले

Posted by - March 29, 2022 0
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *