लहान मुलाचे आधार कार्ड कसे काढावे ? कोणत्या कागदपत्रांची असते गरज ; जाणून घ्या महत्वाची माहिती

298 0

मुलांशी निगडीत महत्त्वाची कामे पार पाडण्यसााठी आधार आवश्यक आहे. आधार कार्डशिवाय पाल्य एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. शाळेत प्रवेशासाठी देखील मुलांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्डचे महत्त्व आणि गरज पाहता ‘UIDI’ ने नवजात बालकासाठी आधार कार्ड जारी करण्यास सुरवात केली आहे. लहान मुलाचे आधार कार्ड कसे काढावे आणि त्यास कोणत्या कागदपत्रांची गरज भासते, हे जाणून घेऊ.

आधार केंद्र किंवा अंगणवाडीतही आधार कार्ड

देशात अनेक रुग्णालयात मुलांचा जन्म होतो. त्यांचे आधार कार्ड काढण्याची सुविधा आता सर्वत्र उपलब्ध झाली आहे. याशिवाय मुलांचे आधार कार्ड हे जवळचे आधार केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रातही काढता येऊ शकते. मुलांचे आधार कार्ड काढण्यासााठी आपल्याला आधार एनरोलमेंट फॉर्म भरावा लागेल. आणि त्यानुसार सर्व माहिती भरावी लागेल. अर्जाबरोबर काही कागदपत्रांची झेरॉक्सही जोडावी लागेल.

प्रक्रिया 

भरलेला अर्ज काऊंटरवर बसलेल्या कर्मचार्‍याला द्या. त्यानंतर संबंधित कर्मचारी हा आपल्या मुलाचे आधार कार्ड तयार करण्यासाठी एनरोलमेंटची प्रक्रिया सुरू करेल. पाल्याचे नाव, वडिलांचे नाव, घराचा पत्ता, जन्मतारीख, लिंग आदी भरल्यानंतर आणि सर्वांची पडताळणी झाल्यानंतर कर्मचारी हा पाल्याचा फोटो काढेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकनॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. ही स्लिप सांभाळून ठेवा. कारण याच एनरोलमेंट नंबरने आपण आधार कार्डचे ऑनलाइन स्टेट्स पाहू शकता आणि डाऊनलोड करू शकता.

कोणत्या कागदपत्रांची गरज ?

मुलांचे आधारकार्ड तयार करण्यासाठी आपल्याला विशेष कागदपत्रांची गरज भासत नाही. मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज पेपर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालकांपैकी एकाचे आधार असणे गरजेचे आहे. पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या आधारकार्डला ‘बाल आधार’ असे म्हटले जाते आणि ते फिकट निळ्या रंगाचे असते.

Share This News

Related Post

पंडित नेहरू नंतर पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी ठरणार दुसरे पंतप्रधान

Posted by - March 3, 2022 0
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण…

#SMART PHONE : हे आहेत 10,000 च्या रेंज मधील लेटेस्ट स्मार्ट फोन ! पाहा स्वस्त स्मार्टफोनची यादी

Posted by - February 28, 2023 0
#SMART PHONE : युजरसाठी त्याचा स्मार्टफोन अनेक अर्थांनी खास आणि महत्त्वाचा असतो. केवळ कॉलिंगसाठीच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहण्यासाठी…

रिसेलचे फ्लॅट खरेदी करताय ? रिसेल फ्लॅटची निवड कशी करायची? हि माहिती अवश्य वाचा

Posted by - August 19, 2022 0
रियल्टी क्षेत्रात अनेक जण रिसेल किंवा पुनर्विक्रीला काढलेले फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतात. असे फ्लॅट खरेदी करण्यामागचे मुख्य कारण असते…

“मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावात…!” आणि शरद पवार संतापले

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : कर्नाटकमध्ये आज महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले करण्यात आले. दगडफेक आणि सातत्याने कर्नाटक सरकारकडून होणारे चितावणीखोर वक्तव्य पाहता सीमावाद आता…

HEALTH-WEALTH : चेहेऱ्यावर ग्लो येण्यासाठी, सांधेदुखी, त्वचा विकार, अनिद्रेपासून सुटका मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय; अंघोळीच्या पाण्यात घाला ‘हा’ पदार्थ

Posted by - December 18, 2022 0
अनेकांना ताणतणाव, सांधेदुखी, अंगदुखी, शांत झोप न येणे, त्वचा विकार अशा समस्या असतात. या सर्वांसाठी मी आज तुम्हाला एक उपाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *