प्रॉपर्टी गहाण कशी ठेवायची ? सर्व प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याबद्दल सविस्तर माहिती…

260 0

कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रांसह अनेक बाबींची पूर्तता करावी लागते . कर्ज कोणते घ्यायचे आहे यावर देखील काही अंशी ते अवलंबून असते. बँकेलाही त्यांची रक्कम परत मिळेल याची हमी हवी असते. त्यासाठी रकमेच्या बदल्यात प्रॉपर्टी गहाण ठेवण्याचा एक पर्याय असतो. याला मॉर्गेज असे म्हटले जाते. ही सर्व प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याबद्दल…

प्रॉपर्टी गहाण कशी ठेवायची ?

गहाण (मॉर्गेज) ठेवणे याचा अर्थ आपली प्रॉपर्टी बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे कर्जाची सिक्युरिटी म्हणून बंधक ठेवणे.

कर्ज घेणारी व्यक्ती जर कर्ज फेडण्यात अपयशी ठरली तर आधीच निश्चित केलेल्या अटींनुसार गहाण ठेवण्यात आलेली प्रॉपर्टी विकून आपली रक्कम वसूल करण्याचा अधिकार बँकेला असतो. यासाठी कर्ज घेणारी व्यक्ती आणि बँक यांच्यामध्ये एक कायदेशीर करार केला जातो. कर्जाची कागदपत्रे तयार करतानाच प्रॉपर्टी गहाण ठेवण्याची कागदपत्रे तयार केली जातात.

एकापेक्षा अधिक कर्ज देणारे असतील तर त्यांच्यामध्ये कायद्यानुसार वाटणी केली जाते. प्र्रॉपर्टी हस्तांतरण कायद्याच्या कलम 58नुसार कोणतीही प्रॉपर्टी गहाण ठेवणे याचा अर्थ सुरक्षा म्हणून प्रॉपर्टीच्या मालकी हक्काचे हस्तांतरण करणे होय.

सिंपल मॉर्गेज : प्रॉपर्टी गहाण ठेवण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग आहे. यात गहाण ठेवण्यात आलेली प्रॉपर्टी कर्ज देणार्‍याकडे हस्तांतरीत केली जात नाही.

मॉर्गेज बाय डीड : जेव्हा एखादी व्यक्ती सुरक्षेच्या कारणावरून आपल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे कर्ज देणार्‍याकडे सुपूर्द करते तेव्हा अशा व्यवहाराला मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स असे म्हणतात.

इंग्लिश मॉर्गेज : या प्रकारात प्रॉपर्टी गहाण ठेवणारी व्यक्ती आधीच निश्चित केलेल्या तारखेला कर्जाच्या रकमेची आणि व्याजाची परतफेड करेल. त्याचबरोबर तो कर्ज देणार्‍याला त्याची प्रॉपर्टी हस्तांतरीत करतो.

अ‍ॅनोमॅलेस मॉर्गेज : जो गहाणवटीचा व्यवहार सिंपल मॉर्गेज या श्रेणीत येत नाही अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांना अ‍ॅनोमॅलेस मॉर्गेज असे म्हणतात.

 

Share This News

Related Post

#MAHARASHTRA POLITICS : “आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार…?” राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांना टोला, वाचा सविस्तर

Posted by - February 10, 2023 0
सातारा : कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठच्या दिक्षांत समारभासाठी कराड येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थिताना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब…

तेच मैदान… तोच जल्लोष फक्त ठाकरे वेगळे !

Posted by - May 1, 2022 0
साल होतं… 1988… बरोबर 34 वर्षांपूर्वी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही अशी डरकाळी फोडली होती.…

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवासाच्या कचोरीची खास रेसिपी

Posted by - September 26, 2022 0
सध्या नवरात्र उत्सवामुळे उपवासाच्या पदार्थांची सर्वच जण चव चाखणार आहेत काही जण नवरात्र उठता बसता उपवास करतात तर अनेक जण…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता शरद पवार दगडूशेठ…

PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 15, 2022 0
पुणे : पुण्यात आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या अनेक सराईत गुन्हेगारांवर आणि टोळक्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा बडगा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *