चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार? पाहा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणितं 

1837 0

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून ,सर्वच राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जवळपास निश्चित आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. पाहुयात याविषयीचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील चर्चेत आला होता. कारण मोदी लाटेतही काँग्रेस कडून बाळू धानोरकर हे खासदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून आले. परंतु नुकतंच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झालं. पतीच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून सहज लोकसभेची उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच त्यांना उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. तर भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही राज्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर या दोघातच काट्याची लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिमा आणि निवडणूक जिंकण्याचा अनुभव केलेली विकास काम ही सुधीर मुनगंटीवार यांची जमेची बाजू आहे तर प्रतिभा धानोलकरांना सहानुभूती आणि ओबीसी असल्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबरच मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघांनाही स्व पक्षातील नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाराजी कोण दूर करेल यावरही जय पराजयाची गणित अवलंबून आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात नेहमीच मत विभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाचा झाला आहे. परंतु त्यासाठी अपवाद ही 2019 ची निवडणूक ठरली कारण वंचितच्या उमेदवाराचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला होता कारण भाजपाची हक्काची काही मत वंचित कडे वळली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीने राजेश बेले यांना उमेदवारी दिली. यंदाच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभेमध्ये बाळू धानोरकरांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं ते मताधिक्य कमी करण्याचे आव्हान सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे असणार आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी या विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती तिथं काँग्रेसला काम करावे लागणार आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात मोठे आंदोलन झालं. मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर इथल्या ओबीसींनी मोठा आंदोलन उभारलं होतं त्याचा फायदा हा प्रतिभा धानोरकर यांना होऊ शकतो परंतु तिकीट मिळवण्याच्या संघर्षात आमदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याची विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांची संबंध ताणले गेले त्याचा फटका प्रतिभा धानोरकर यांना बसण्याची शक्यता आहे.
हंसराज अहिर यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेकदा अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरलं आहे. हंसराज आहेत हे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेचा अपवाद वगळता हंसराज अहिर हे मुनगंटीवार यांच्यासोबत मंचावर दिसलेले नाहीत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांची भूमिका सुद्धा येथे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वितृष्ट हे जग जाहीर आहे. परंतु स्वर्गवारे फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असल्याने शेवटच्या क्षणी ते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत दिसतील अशी अनेकांना आशा आहे. माजी खासदार नरेश फुगली आहे यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नसून राजुरा चे माजी आमदार ऍडव्होकेट वामनराव चटप यांचा पूर्व इतिहास बघता ते कोणालाही थेट मदत करणार नाही परंतु त्यांचे समर्थक काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे.

Share This News

Related Post

को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात – खासदार श्रीरंग बारणे

Posted by - August 26, 2022 0
पुणे : पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही.…

सिंहगड रस्त्याने येत असल्यास सावधान! सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने अपघाताची शक्यता PHOTO

Posted by - November 3, 2022 0
पुणे : आज सकाळी ०६•४० वाजता सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले होते. अग्निशमन दलाच्या…

बीड : अंबाजोगाईत ट्रक-जीपचा भीषण अपघात; सात प्रवासी जागीच ठार

Posted by - April 23, 2022 0
बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले…

‘RSS संघराज’ Facebook Page च्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी ; सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी , रा.स्व.संघाची मागणी

Posted by - August 17, 2022 0
पुणे : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे.…

अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! होऊ शकते फसवणूक

Posted by - April 26, 2023 0
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *