मंत्रिमंडळ बैठक : आणीबाणीमधील बंदिवास सोसावा लागलेल्यांना पूर्वीप्रमाणेच मानधन

178 0

मुंबई : देशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना पूर्वीप्रमाणेच देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भातील विनंती लोकप्रतिनिधी यांनी शासनास केली होती. या योजनेंतर्गत 1 ऑगस्ट, 2022 पासून मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 5 हजार रुपये मानधन, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 2 हजार 500 रुपये इतके पूर्वीप्रमाणेच मानधन देण्यात येईल.

लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या विपरीत परिणामाच्या पार्श्वभूमीवर खर्चात काटकसर करण्यासाठी ही योजना 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आली होती.

योजना बंद झाल्याच्या कालावधीपासून योजना मंजूर झालेल्या व्यक्तींना थकबाकी देण्यास सुद्धा मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे नव्याने अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 इतका राहणार आहे. यासाठी आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी 3 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहील.

Share This News

Related Post

पुणे : आज शहरात आगीच्या 2 भीषण घटना; पुणे अग्निशमन दलाची प्रशंसनीय कामगिरी

Posted by - November 1, 2022 0
पुणे : आज दिनांक ०१•११•२०२२ रोजी सकाळी 8:15 वाजता कोंढवा, लुल्लानगर चौक, मार्वल व्हीस्टा इमारत येथे आग लागल्याची घटना घडली…
Govindbagh

Pune News : पवार समर्थकांनी गोविंदबाग फुलली; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Posted by - November 14, 2023 0
पुणे : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबीयांकडून साजरा…

काहीतरी चटपटीत हवंय आणि झटपटही…? घरच्या घरी असा ‘मसाला पापड’ ट्राय करा

Posted by - November 18, 2022 0
घरी आपण बरेचसे पदार्थ बनवतो. पण रोजच्या जेवणामध्ये असं चटपटीत तरी काय बनवणार ? नक्कीच जेवण बनवणाऱ्याला देखील हा प्रश्न…

पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास…

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट, वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 4, 2022 0
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *