छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘तीन’ दैवी तलवारींचा इतिहास; त्या सध्या कुठे आहेत ?

344 0

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक विराजमान झाल्यानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या संग्रहात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा नावाची रत्नजडित तलवार महाराष्ट्राला परत मिळावी म्हणून सरकार प्रयत्न करत आहे.हा ऐतिहासिक ठेवा परत मिळवण्याचे प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत. जगदंबा तलवारी सोबतच शिवाजी महाराजांच्या आणखी दोन तलवारी कुठल्या आणि त्या सध्या कुठे आहेत याविषयी माहिती जाणून घेऊया.

तुळजा, भवानी आणि जगदंबा या छत्रपतींच्या तीन दैवी तलवारी होत्या.

भवानी तलवार

See the source image

सर्वांत चर्चेत असणारी भवानी तलवार ही कुठे आहे याबद्दल अनेक समज- गैरसमज होते. भवानी तलवार रत्नजडित असून ती स्पेनमध्ये तयार करण्यात होती, असं काही इतिहासकार सांगतात. शिवाजी महाराजांचे सरदार अंबाजी सावंत यांनी कोकणात एका पोर्तुगीज जहाजावर हल्ला करून जो ऐवज हस्तगत केला, त्यातील एक नामी तलवार छत्रपतींना खूप भावली. मग त्यांनी खास स्पेनमधून तशीच तलवार करवून घेतली, असं म्हणतात. तलवारीच्या मुठीला हिरे- माणकं जडवली गेली. जी जगदंबा तलवार आता परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तीच भवानी तलवार असल्याचा समज अनेक दिवस होता. पण छत्रपतींच्या पावन स्पर्शाने आणि थेट तुळजा भवानीच्या आशीर्वादाने पुनित झालेली ही तलवार महाराष्ट्रातच आहे. तीसातारचे छत्रपती उदयनराजे यांच्या संग्रहात आहे. दरवर्षी दसऱ्याच्या शस्त्रपूजेच्या वेळी या भवानी तलवारीची विधीवत पूजा केली जाते.

जगदंबा तलवार

जगदंबा तलवार सध्या ब्रिटीश रॉयल कलेक्शनचा एक भाग आहे. ती प्रिन्स एडवर्ड यांना 1875-76 दरम्यान त्यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी भेट देण्यात आली होती, असा उल्लेख इंग्लंडमध्ये आहे. त्यावेळी महाराजांचे वंशज छत्रपती शिवाजी चौथे कोल्हापूरच्या गादीवर होते. करवीर संस्थानच्या भेटीत किंग एडवर्ड म्हणजे त्यावेळचे प्रिन्स एडवर्ड यांना शिवाजी राजांनी ती भेट दिली. ही भेट किती प्रेमाची होती याविषयी इतिहासप्रेमींना शाश्वती नाही. छत्रपती शिवाजी चौथे त्या वेळी केवळ ११ वर्षांचे होते आणि प्रिन्स एडवर्ड यांचा असलेल्या पुरातन शस्त्रास्त्र जमवण्याचा छंद विचारात घेता ही जगदंबा तलवारीची भेट कितपत स्वेच्छेने होती, याविषयी शंका आहे. कारण शिवरायांच्या तलवारीच्या बदली एडवर्डने दुसरी एक तलवार तत्कालीन राजांना दिली, जी आजही कोल्हापूरच्या पॅलेसमध्ये संग्रहात आहे.

तुळजा तलवार

See the source image

तिसरी तुळजा तलवार ही शिवरायांना शहाजीराजांकडूनच मिळालेली होती, असं मानतात. या तलवारीचा ठावठिकाणाही बरेच वर्षं लागत नव्हता. पण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मते, सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या मंदिरात काचेच्या पेटीत जपून ठेवलेली तलवार हीच छत्रपतींची तुळजा तलवार आहे. असं मानलं जातं.

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Posted by - January 15, 2024 0
जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका,…

कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची सूचना

Posted by - March 21, 2022 0
कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने केली आहे. सध्या…

पुणे पोलीस आयुक्तांचा धडाका ! 12 जणांवर ‘मोक्काची’ कारवाई

Posted by - April 10, 2022 0
शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी…
Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *