MAHARASHTRA POLITICS : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे घराण्यातील ‘या’ व्यक्तीची होणार राजकारणात एन्ट्री; वाचा सविस्तर

172 0

(इंदापूर) पुणे : ठाकरे घराण्यातील ‘या’ व्यक्तीने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्या विषयी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “सध्या तरी राजकारणात येण्याचा विचार नाही, पण नाही म्हणत नाही”. असे वक्तव्य करून चर्चेला नवीन विषय दिला आहे. हे वक्तव्य केले आहे ठाकरे घराण्यातील निहार ठाकरे यांनी… निहार ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.

इंदापूरमध्ये टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना निहार ठाकरे म्हणाले की, “ठाकरे गटाने दिलेली २ लाख 50 हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केली आहे ,हे आत्ताच समजले. तसेच ही सर्व प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या फॉरमॅटमध्ये नव्हती. याचा नक्कीच फटका हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसू शकतो. यात प्रमुख मुद्दा असा आहे की, बहुमत कुणाकडे आहे ? ज्यांच्याकडे जास्त आमदार,खासदार असतील त्यांच्याकडे… ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांनाच निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह देईल. तर या नियमानुसार निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल. असा विश्वास निहार ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच शिंदे गटाशी जवळीक असलेले निहार ठाकरे म्हणाले की, जर राजकारणात प्रवेश केलाच. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

DAILY HOROSCOP : सिंह राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम ; वाचा आजचे राशिभविष्य

Posted by - September 21, 2022 0
मेष राशी : चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो…

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…

दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

Posted by - September 29, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे.…

समाधानकारक : लंपी संदर्भातील उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आजार नियंत्रणात; सध्या फक्त ८२७ बाधित जनावरे

Posted by - October 15, 2022 0
पुणे : पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार…

#CM EKNATH SHINDE : नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री आजोबा पोहोचले गल्लीतल्या किराणा दुकानात; व्हिडिओ होतोय व्हायरल

Posted by - March 7, 2023 0
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. अतिशय सामान्य जीवन जगलेले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *