HEALTH WELTH : नेहमी कोरडा खोकला होतो ? वाचा आहे घरगुती उपाय

512 0

HEALTH WELTH : हवामान बदलले की अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होत असतो ज्यांची कफ प्रकृती असते त्यांना हा त्रास अधिक जाणवतो तर अनेकांना सर्दी गेल्यानंतर कोरडा खोकला होतो. या कोरड्या खोकल्याची उबळ ही खूप त्रासदायक होते. एकदा खोकल्याची उबळ आली की ती पाणी प्यायले तरीही लवकर थांबत नाही. या कोरड्या खोकल्यावर आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. ज्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल सातत्याने हा त्रास होत असेल तर या घरगुती आयुर्वेदिक उपायांसह योग्य वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

१. आले स्वच्छ धुवून किसून घ्यावे किंवा अगदी पातळ बारीक चकत्या कराव्यात यावर काळे मीठ टाकावे हे चाटण दिवसभरातून दोन ते तीन वेळा जिभेखाली अवश्य धरा याने आराम मिळू शकतो.

See the source image
२. दोन कप पाणी घ्यावे या पाण्यामध्ये तुळशीची सात-आठ पाने स्वच्छ धुऊन टाकावीत त्यानंतर दोन लवंगा दोन काळीमिरी बारीक आल्याचा तुकडा एक वेलची आणि एक चमचा गूळ घालून पाणी दोन कप चे एक कप होईपर्यंत उकळा हा काढा गाळून गळा शकत प्या खूप आराम मिळेल.

See the source image
३. आणखीन एक सोपा उपाय आहे तो म्हणजे लवंग आणि मधाचा यासाठी तव्यावर काही लवंगा भाजून घरात ठेवल्या तर उत्तमच उबळ आल्यानंतर ही लवंग मधामध्ये घोळून जिभेखाली धरा खोकला थांबण्यास मदत होईल.

See the source image
४. हळदीचे दूध पिणे हा उपाय तुम्ही यापूर्वीही बऱ्याच वेळा ऐकला असेल परंतु अनेक जण हे हळदीचे दूध बनवताना गल्लत करतात आणि हळदीचे कण घशात अडकल्याची तक्रार देखील करतात लक्षात ठेवा हळदीचे दूध बनवताना पातेल्यामध्ये दूध घातल्यानंतर एक कप दुधामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे मिश्रण चांगले उकळवून घ्यायचे आहे आधी दूध उकळून कपात घेतल्यानंतर वरून हळद घालून हलवू नका हळद दुधामध्ये चांगली विरघळू द्या हा देखील सर्वोत्तम उपाय आहे.

See the source image

तुम्हाला हे उपाय कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

Share This News

Related Post

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022 0
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड…

१२व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्‍या सत्रात राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉ.सी पी जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार

Posted by - September 16, 2022 0
पुणे: भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील .या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये…

महत्वाची बातमी, विधान परिषदेच्या मतमोजणीला अखेर सुरुवात.LIVE UPDATE

Posted by - June 20, 2022 0
मुंबई- काँग्रेसने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे रखडलेली मतमोजणी अखेर सुरु झाली आहे. लवकरच…

लम्पी रोगामुळे नुकसान भरपाईपोटी राज्यात 3091 पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह

Posted by - November 1, 2022 0
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा…

उद्योग क्षेत्रातील मंडळींसाठी ‘सेन्सर टेक्नॉलॉजी’ चे प्रदर्शन

Posted by - March 3, 2022 0
उद्योगक्षेत्रात सेन्सर टेक्नॉलॉजी म्हणजेच संवेदना असणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असून यासाठीच केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत अंतर्गत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *