अर्थकारण : वापरात नसलेले बँक खाते पुन्हा चालू करायचं आहे ?

289 0

दीर्घकाळ एखाद्या बँक खात्यातून व्यवहार झाले नाहीत तर ते खाते इनऑफरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते म्हणून ओळखले जाते. सलग दोन वर्षे एखाद्या खात्यात कोणताच व्यवहार झाला नाही, तर ते खाते इनऑपरेटिव्ह म्हणून ओळखले जाते. तुमचे खाते इनऑपरेटव्हि ठरवले गेले तर त्यातून तुम्हाला कोणतेच व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे असे खाते ग्राहकांना ऑपरेटव्हि करून घेणे म्हणजे पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करून घेणे आवश्यक असते.

आपले वापरात नसलेले खाते पुन्हा वापरात आणण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याकरिता ग्राहकाने बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या खात्याची नेमकी स्थिती काय आहे, याचा शोध घ्यावा.

  • बँकांच्या संकेतस्थळांवर ज्या ज्या ग्राहकांची खाती इनऑपरेटीव्ह झाली आहे, त्याची माहिती दिलेली असते. बँकांना आपल्या संकेतस्थळावर अशा खात्यांची माहिती ठेवणे आवश्यक असते.
  • वापरात नसलेले खाते पुन्हा चालू करण्यासाठी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाला अर्ज द्यावा लागतो. तुमचे खाते दीर्घकाळ का वापरात नव्हते, याचे कारण या अर्जामध्ये देणे आवश्क असते. जर तुमचे खाते जॉईंट असेल तर सर्व खातेदारांच्या सह्या अर्जावर असणे आवश्यक असते.
  •  या अर्जाबरोबरच केवासीची कागदपत्रेही सादर करावी लागतात. त्यात आपले छायाचित्र, पॅनकार्ड, राहत्या जागेचे पुरावे आणि ओळखीचे पुरावे अशा कागदपत्रांचा समावेश असतो.
  •  ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या खात्यामध्ये काही रक्कम भरण्यास सांगितली जाते.
  • रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार इनऑपरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते पुन्हा चालू करण्याकरिता बँक ग्राहकांकडून कसलेच शुल्क घेत नाहीत. जर तुमची त्या बँकेत मुदत ठेव असेल आणि त्यामुदत ठेवीचे व्याज बचत खात्यात नियमित पद्धतीने जमा होत असेल तर आपले खाते इनऑपरेटीव्ह होत नाही. जर तुम्हाला एखादे खाते वापरायचेच नसेल तर ते सरळ बंद करणेच योग्य ठरते.
  • एकापेक्षा अनेक बँक खाती चालू ठेवणे अनेकांना शक्य नसते. यामागे वेगवेगळी कारणे असतात. आपापल्या सोयीचा विचार करून ग्राहक कोणत्या खात्यात नियमित व्यवहार करायचे याचा निर्णय घेत असतात. त्यामुळे जे खाते वापरण्याची इच्छा नसेल ते खाते बंद करणे योग्य ठरते.
Share This News

Related Post

पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गो-हे यांना मातृशोक

Posted by - February 20, 2023 0
पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गो-हे यांच्या आई श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी…

एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचा फोटो व्हायरल; पाहा कोण आहेत आमदार

Posted by - June 22, 2022 0
शिवसेनेशी बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्यासह असणाऱ्या 35 आमदारांचा फोटो समोर आला असून यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेला…

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभागाची बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक संपन्न ; 13 प्रमुख बँकांचा सहभाग

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) विभागाने आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,  ताज सांताक्रूझ,येथे…

इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर कंडिशन इंजिनियर्स (ISHER) संस्थेच्यावतीने जागरुकता परिषद संपन्न..

Posted by - August 23, 2022 0
पुणे : भारताने २०७० वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणण्याचे मिशन हाती घेतले आहे. याबाबतील इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एअर…

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

Posted by - February 2, 2022 0
बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *