RAIN UPDATE : राज्यात कोसळणाऱ्या पावसाने धरण पाणी पातळीत वाढ ; नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

193 0

RAIN UPDATE : राज्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने वीर धरण ,भामा आसखेड धरण ,आणि गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्र मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरण पातळीत वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

वीर धरण

वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन ८०० क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी ९ वाजता ४६३७ क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्या नीरा नदीपत्रात एकूण ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भामा आसखेड धरण

भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी १० वाजता ६७०.९० मी आणि एकूण पाणीसाठा (२२१.५१३ दलघमी ९५.७९ %) झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा बघता पूढील १० ते १५ तासात प्रकल्प ९८% होऊ शकतो . त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याचा येवा यानुसार सांडव्यावरून भामा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गुंजवणी धरण

गुंजवणी धरण जलाशय पातळी वाढत असून विद्युतगृहातून २०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी/जास्त होईल. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन कार्यकारी अभियंता निरा देवघर प्रकल्प विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला : महापौर मुरलीधर मोहोळ

Posted by - March 9, 2022 0
पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता…
uddhav-thackeray-devendra-fadanvis-ajit-pawar-eknath-shinde

Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज ‘सभांचा धडाका’ सत्ताधाऱ्यांसह विरोधक साधणार एकमेकांवर निशाणा

Posted by - August 27, 2023 0
पुणे : आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष कामाला लागले (Marathwada Political Sunday) असून, राज्यभरात महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला…
Manoj Jarange

Manoj Jarange : आरक्षणासाठी कोणी काय केलं, 24 डिसेंबरनंतर सगळंच सांगणार; मनोज जरांगेंनी दिला इशारा

Posted by - November 14, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उद्यापासून ते महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार…
Megha Pawar

शेतकऱ्याच्या मुलीची नेत्रदिपक कामगिरी! ए.फार्मा परीक्षेत मिळवले सुवर्णपदक

Posted by - June 15, 2023 0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पवार या विद्यार्थिनीने एम फार्मच्या परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवून नेत्रदीपक अशी…

#Budget : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात, वाचा सर्व अपडेट्स

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *