पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगने दुकानात घुसून पळवले ब्रँडेड कपडे

378 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत रेडीमेड दुकानात कपड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हाणे वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वीही कोयता गँगने पिंपरीतील एम जी शुज शॉप मध्ये देखील शूज चोरी करण्यासाठी दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करुन मोठी तोडफोड केली होती. काल पुन्हा चिखली येथिल ताम्हाणे वस्ती येथील पीसीएमसी फॅशन हब या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून दुकान मालकाच्या आईवर कोयता गँगने वार करुन सात हजार पाचशे रूपये किमतीचे तीन शर्ट आणि तीन जिन्स पळविले आहेत.

कोयता गँगच्या हल्ल्यात कुसुम ईश्वर नागरगोजे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात उदयास आलेल्या छोट्या छोट्या कोयता गँगमुळे पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News

Related Post

शिवसेनेचे आक्रमक नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर ; हातात पायताण घेऊन म्हणाले लोक त्यांना आता जोड्याने…

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वादविवादाने आता रौद्ररूप धारण केले आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या…

पुण्यातील शाळा तूर्तास बंदच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

Posted by - January 22, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील एक आठवडाभर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय एकमतानं झाला असल्याची…

#Pune : तरुणाचे व्यायाम करून झाल्यानंतर फोनवर बोलत असताना दुर्दैवी निधन; मृत्यूचे कारणही आहे धक्कादायक ;नक्की जबाबदार कोण ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

चार्टर्ड प्लेन मधील फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांची बोलती बंद

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी आपण सुरत कशी सुटका करून घेतली, कसाबसा जीव वाचवून परत आलो, याची रंजक कहाणी बुधवारी…
Book Publication

डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन; ‘पोएम म्हंजी काय रं?’ पुस्तकाचे प्रकाशन

Posted by - May 7, 2023 0
पुणे : ‘पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समोर आणता किंवा समाजमाध्यमांवर जेव्हा लिहिता, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *