बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

383 0

पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी अटक केली.

निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. दोघांच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा हे दोघेजण मूळचे राजस्थानमधील असून त्यांनी आजपर्यंत कर्नाटक, महाराष्ट्र, आणि हरयाणा राज्यातील एकूण २५५ मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे तसेच त्यांचे शारीरिक शोषण केले आहे.

कधी अभव कश्यप तर कधी अदीत व्यास… कधी आघव अग्निहोत्री तर कधी अश्विक शुक्ला अशा वेगवेगळ्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून केंद्र सरकारच्या विविध खात्याचे बनावट आयकार्ड तयार करून हे दोन भामटे मेट्रोमोनीयल साईटवर आपली माहिती द्यायचे. त्यांच्याशी संपर्क केलेल्या मुलींशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे.

पुण्यती सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांच्याशी काही पीडित तरुणींनी संपर्क साधला असता धारणे यांनी त्यांची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी धारणे यांनी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या दोघांना अटक केली. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पिंपरी-चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - September 12, 2023 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या बाप लेकांचा तडफडून मृत्यू…
Sindhudurga News

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Posted by - May 24, 2024 0
सिंधुदुर्ग : उजनी जलाशयात बोट उलटून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना (Sindhudurga News) आता वेंगुर्ल्यातही बोट बुडाल्याची धक्कादायक…
Laila Khan Case

Laila Khan Case : 13 वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीला मिळाला न्याय; तिच्या हत्याकांडाने देशात उडाली होती खळबळ

Posted by - May 10, 2024 0
मुंबई : बॉलिवूडमधील एका दिवंगत अभिनेत्रीला तब्बल 13 वर्षांनी न्याय (Laila Khan Case) मिळाला आहे. 7 फेब्रुवारी 2011 मध्ये तिची…

पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Posted by - July 29, 2022 0
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22…
Pune loksabha

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या रिंगणात ‘AIMIM’ची एन्ट्री; त्यामुळे कोणाला होणार फायदा अन् कोणाला बसणार फटका?

Posted by - April 17, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेच्या (Pune Loksabha) रिंगणात ‘एआयएमआयएम’ पक्ष देखील उतरला असून त्यामुळे आता पुणे लोकसभेची लढत चौरंगी होणार आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *