Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

302 0

मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील (Maharashtra Politics) यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

‘या’ नेत्यांनी देखील शिवसेनेत केला प्रवेश
प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर या पदाधिकाऱ्यांनी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

कोण आहेत प्रदीप पाटील?
प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली. मात्र आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

50 खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, 50 कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी : आम आदमी पार्टी

Posted by - October 31, 2022 0
आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू…

‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना सवाल

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: ‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी…

Maharashtra Politics : फडणवीसांचा शपथविधी बेकायदेशीर – काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेली ‘शपथ’…

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Posted by - April 30, 2024 0
पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून सर्वांचंच लक्ष्य लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत एक…

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी : महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात; आज खुद्द शरद पवार तर उद्या आदित्य ठाकरे करणार प्रचार !

Posted by - February 22, 2023 0
पुणे : पुणे आणि चिंचवडमध्ये सध्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या दोन्ही जागांवर यापूर्वी भाजपचे आमदार विराजमान होते. कसबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *